गोलमाल फेम विकास कदमची बातच न्यारी; करतोय कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा भारी

सध्या देशात कोरोना महामारीने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. अशातच ऑक्सिजनचा साठा, रेमेडीसीवर इंजेकशन्सचा तुटवडा आणि अपुरी आरोग्य सुविधा यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

आपण गोलमाल, सिंघम, बोलबच्चन यांसारखे रोहित शेट्टीचे सिनेमे आवर्जून पाहतो. त्या सिनेमांमध्ये मराठी कलाकार मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात. रोहित शेट्टीच्या सिनेमांमध्ये एक मराठी कलाकार नेहमी असतो तो म्हणजे विकास कदम.

छोटयाश्या पात्रात आपली छाप सोडणे यात विकास कदम अत्यंत पटाईत आहे. तो आपल्याला त्याच्या अभिनयातून हसून हसून लोटपोट करून सोडवतो. मात्र श्रीयुत गंगाधर टिपरे ह्या मालिकेतील सर्वच पात्रांनी आपल्या सर्वच पॅटर्नची रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

या मालिकेतून विकास कदम ला ‘शिऱ्या’ नावाची नवीन ओळख मिळाली आहे. हा ‘शिऱ्या’ अर्थातच विकास कदम आता कोविड वॉरियर बनला आहे.आपल्या कामांनी तो आता लोकांना थक्क करून सोडत आहे. बीकेसी मध्ये विकासने कोविड टेस्टिंग लॅब उभारली आहे. कोणत्याही प्रकारची प्रसिद्धीची हाव न ठेवता विकास काम करत आहे.

मागच्या सहा ते आठ महिन्यांपासून विकास हे काम करत आहे. ज्यावेळी एका वृत्त वाहिनीला हे समजले त्यानंतर त्यांनी विकासशी संपर्क साधला. खरतर या कामाचा गाजावाजा होऊ नये असे त्याला वाटत असल्याने त्याने तसं बोलून दाखवलं. त्याला कारण विचारले असता त्याने सांगितले की मी पहिली कोविडची लाट अत्यंत जवळून अनुभवली आहे.

मागच्या लाटेच्या वेळी देखील मी पुरेपूर काळजी घेतलेली आहे असे देखील त्याने यावेळी सांगितले आहे. हे काम करत असताना त्याला दोन वेळा कोविड होऊन गेला आहे. यामुळे त्याच्या मुलांना देखील कोविड होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
रेमडीसीवीरचा काळाबाजार उघडकीस, पत्रकारच करत होता काळाबाजार; लाखोंचा माल जप्त
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंडी खाणे शरीरासाठी ठरतय घातक; वाचा तज्ञ काय म्हणतात..
कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेचे वाजले बारा; वृद्धावर सायकलवरून मृतदेह नेण्याची आली वेळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.