‘असा एकही दिवस जात नाही शीतल…’ लेकीच्या आठवणीत डॉ. विकास आमटे भावुक

मुंबई | काही दिवसांपूर्वीच महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली. यामुळे राज्यासह देशातील अनेकांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यानंतर २६ जानेवारीला शीतल यांच्या जन्मदिवशी वडिलांनी आपल्या कन्येच्या आठवणीने व्याकुळ होत भावुक पोस्ट केली आहे.

‘आज शीतलचा वाढदिवस. आज तू हवी होतीस शीतल. असा एकही दिवस जात नाही, जेव्हा तुझी आठवण येत नाही. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा’. अशा शब्दांत विकास आमटेंनी Facebook वर पोस्ट केली आहे. या भावनिक पोस्टसोबत त्यांनी लेकीसोबतचा आपला एक फोटो शेअर केला आहे.

गौतम करजगी यांची फेसबूक पोस्ट…
शीतल यांचे पती गौतम करजगी यांनी फेसबूक पोस्ट केली आहे. फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘तू माझ्यासोबत नाहीस, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीय. आपण चाळीशीचे झाल्यानंतर पुढचं जीवन कसं व्यतीत करायचं याबाबत अनेक योजना आपण आखल्या होत्या. त्यातच आयुष्यात वर्षांची भर घालण्यापेक्षा वर्षांमध्ये आयुष्याची भर घालत जाणं जास्त महत्त्वाचे आहे, असे तुझे नेहमी सांगणं असायचे’ असे गौतम करजगी यांनी म्हंटले आहे.

तसेच ‘मला आज खूप वेदना होत आहेत कारण ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझाही विश्वासघात केला आहे. तुझ्यापासून सुटका करून घेण्यात ते यशस्वी ठरलेत खरे पण आनंदवनाला ते तुझ्यापासून वेगळं करू शकणार नाहीत. कारण आनंदवनात बाबा आणि ताईंनंतरची जागा तू कधीच मिळवली आहेस,’ असे म्हणत त्यांनी आठवणींना उजाळा दिला.

महत्त्वाच्या बातम्या
‘ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझा विश्वासघात केला’
आंदोलनकर्त्या सर्व शेतकऱ्यांना तुरुंगात टाकून त्यांची सगळी संपत्ती जप्त करा; बेताल कंगणा
मुकेश अंबानी, संजय राऊतांसह ९७ जणांना पद्म पुरस्कार देण्याची राज्याची शिफारस मोदी सरकारने नाकारली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.