विजू माने यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पांडू'(Pandu) या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. या चित्रपटात अभिनेते भाऊ कदम यांनी पांडू हवालदारची भूमिका केली होती. तर अभिनेते कुशल बद्रिके यांनी म्हादुची भूमिका केली होती. म्हादू आणि पांडू या जोडीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं होतं. ‘पांडू’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली होती.(viju mane kushal badrike talk about their new movie viral video)
नुकताच दिग्दर्शक विजू माने यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक विजू माने आणि कुशल बद्रिके त्यांच्या नवीन चित्रपटाबद्दल माहिती देत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कुशल बद्रिके आणि दिग्दर्शक विजू माने थट्टामस्करी करत नवीन चित्रपटाबद्दल बोलत असल्याचे दिसत आहे.
हा व्हिडिओ शेअर करत असताना कुशल बद्रिके यांनी म्हंटले आहे की, “मी विजू सरांना म्हंटलं आता next project पांडू २ करूयात ता ते म्हणाले नको, आपण शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा सिनेमा करू, कारण सध्या समाजाला शिक्षणाची गरज आहे… कारण या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने टूव्हीलरचं स्पेलिंग लिहिण्यात आलं आहे.”
“या गोष्टी पाहून शिक्षणाची सध्याची परिस्थिती लक्षात येईल. तसेच ज्या ठिकाणी टूव्हीलरच्या पार्किंगचा बोर्ड लावण्यात आला आहे, त्या ठिकाणी चक्क रिक्षाचं पार्किंग करण्यात आलं आहे”, असं व्हिडिओमध्ये कुशल बद्रिके आणि विजू माने यांनी म्हंटलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युझरने या व्हिडिओवर कमेंट करत म्हंटले आहे की, “लयं बेकार होती ही टूव्हीलर.” तर दुसऱ्या युझरने कमेंट करत म्हंटले आहे की, “मग तर चांगलीच संकल्पना आहे. तर एका युझरने या व्हिडिओवर ‘खतरनाक’ अशी कमेंट केली आहे. अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतो.
कुशल बद्रिके नेहमीच सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो. ‘पांडू’ चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानचे व्हिडिओ देखील अभिनेता कुशल बद्रिकेने शेअर केले होते. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या सेटवरील भाऊ कदम आणि अभिनेत्री श्रेया बुगडे यांचे व्हिडिओ अभिनेता कुशल बद्रिके त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असतो.
महत्वाच्या बातम्या :-
..म्हणून मला भारतीय पाकिस्तानात जा असं म्हणतात, बॉलिवूडच्या खानने व्यक्त केले दु:ख\
RRR नंतर थलपथी विजय चित्रपटगृहात करणार धमाका, ‘BEAST’ चित्रपटाचा टीझर झाला रिलीज
तरुणीला खतरनाक स्टंट करणे पडले महागात, पाय सटकला अन् पडली पाण्यात, पहा व्हिडीओ