विजयसिंह मोहिते-पाटील भाजपच्या विशेष निमंत्रित यादीमध्ये; आता अधिकृतपणे होणार भाजपवासी

सोलापूर । माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव भाजपच्या विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये घेण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव असलेल्या या यादीमध्ये विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव 17 व्या क्रमांकावर आहे.

त्यांचा जिल्हा मात्र सातारा दाखविला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून मी राष्ट्रवादीतच असल्याचे सांगणारे मोहिते-पाटील आता खरोखरच भाजपवासी झाल्याचे दिसून येते.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी नरेंद्र मोदी यांची मोठी सभा अकलूज येथे घेण्यात आली होती. येथे भाजपचा उमेदवार देखील निवडून आलेला होता.

मोदींच्या सभेत व्यासपीठावर माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पहिल्यांदा भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यानंतर झालेल्या सभेमध्ये विजयसिंह मोहिते-पाटील व्यासपीठावर होते. पण, आपण राष्ट्रवादीच असल्याचे त्यानंतरही त्यांनी सांगितले होते.

आज जाहीर झालेल्या यादीत मोहिते-पाटील यांचे नाव आहे. त्यामुळे तेही आता भाजपवासी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.