पैसे नाहीत म्हणून ट्रॅक्टरसाठी गाय विकली, आता १८० ट्रॅक्टर उभे करण्यासाठी जमीन कमी पडू लागली

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या शेती व्यवसायाचे कोरोना, दुष्काळ, अतिवृष्टी तर कधी कधी कमी हमीभाव यामुळे कंबरडे मोडले आहे. शेतकरी शेती व्यवसाय करत असतानाच दुसऱ्या उत्पन्नाच्या स्त्रोतांची गरज देखील त्याला सद्य परिस्थितीत आहे.

कर्जत येथील डोंबळवाडी या गावातील विजयराव गलांडे यांनी इतर शेतकऱ्यांसमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे. विजयराव यांच्या घरात एकूण 50 सदस्य आहेत. विजयरावांचे शिक्षण दहावी पर्यंत झाले आहे. त्यांचे चुलते कुरकुंभच्या पारस फुड्समध्ये नोकरीला होते. त्यांच्या वडिलांकडे एक ट्रक होता.

हा ट्रक कारखान्यामधून भुश्याची ने-आण करत होता याच ट्रकमुळे विजयरावांना एक भन्नाट कल्पना सुचली. विजय रावांनी या ट्रकच्या वाहतुकीबाबत माहिती घेतली तसेच त्यांनी कामगार कराराबद्दल जाणून घेतलं. व्यवसायाची संपूर्ण माहिती करुन घेतली. पूर्ण अभ्यास केल्यावर विजयरावांनी व्यवसायात उतरायचं ठरवलं.

विजयरावांनी ट्रॅक्टर घ्यायचे ठरवले.पण पुरेसे पैसे नव्हते यासाठी त्यांनी आपल्या गायी विकल्या तसेच बँक ऑफ बडोदा कडून लोनवर पहिला ट्रॅक्टर उभा केला. येथूनच भुसा वाहतुकीचा व्यवसाय सुरू झाला. अशाच प्रकारे ते हळू हळू ट्रॅक्टर खरेदी करत गेले. त्यांची ३२ एकर जमीनही होती.

गलांडे कुटुंबानी एका कारखान्यापासून भुसा वाहतुकीच काम सुरू केलं होत आणि आता ते ४० कारखान्यापर्यंत विस्तारले आहे. एकेकाळी ट्रॅक्टर घेण्याईतके पैसे नसलेल्या कुटुंबाकडे आज तब्बल १८० ट्रॅक्टर आहेत. नुकतेच या कुटुंबाने ३० नवीन ट्रॅक्टर खरेदी केले आहेत.

गलांडे या कुटुंबाच्या व्यायसायचे नाव ‘विजय राज ग्रुप’ असं आहे. या ग्रुप मधून अडीच हजार लोकांना रोजगार मिळतो. या ग्रुपमध्ये काम करण्यासाठी आंध्रप्रदेश उत्तरप्रदेश,बिहार, तामिळनाडू, अशा अनेक भागातून कामगार येतात वर्षातून १० महिने हा ग्रुप काम करतो. यामधून ५० कोटींची उलाढाल हा ग्रुप करतो.

 

महत्वाच्या बातम्या
ही आहे जगातील सगळ्यात शांत जागा जेथे शरीरातून वाहणाऱ्या रक्ताचाही आवाज येतो, वाचून अवाक व्हाल
ती काहीही करण्यासाठी मुक्त आहे; अमृता फडणवीसांनी शेअर केला बोल्ड फोटो
ती चारित्र्यहीन आहे, तिला लाजलज्जा नाही, पडद्यावर चुंबन घेते; मल्लिकाने सांगीतला बाॅलीवूडचा खतरनाक अनुभव
“पांढरे केस का लपवत नाहीस?”; वडिलांच्या प्रश्नावर समीरा रेड्डीने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाली…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.