डॉक्टर म्हणाले, दोन दिवसांपेक्षा जास्त आजी जगणार नाही, पण आजीने सर्वांना चुकीचे ठरवले

राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धूमाकूळ घातला आहे. अशा परिस्थिती अनेक धक्कादायक आणि आश्चर्यकारक घटनाही घताना दिसून येत आहे. अशीच एक घटना सोलापुरमध्ये घडली आहे.

एका ६० वर्षांच्या आजींना रक्तदाबाचा आणि मधूमेहाचा त्रास होत होता. असे असताना त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. अशात आजींची ऑक्सिजन पातळी घसरली होती. डॉक्टरांनी आजींच्या जगण्याची आशा सोडली पण आजींनी हिंमत न हारता कोरोनाला पळवून लावले आहे.

मंगळवेढ्यातील बाचवी गावात राहणाऱ्या आजींचे नाव विजया गायकवाड असे आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मधूमेहाचा त्रास आहे, तसेच रक्तदाबाचाही त्रास आहे. त्यामुळे आजींची ऑक्सिजन पातळी घसरली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयात ते कोरोनाविरुद्ध लढा देत होत्या, पण आजूबाजूचे रुग्ण पाहून त्यांना तिथे व्यवस्थित वाटतं नव्हते. त्यामुळे मला घरी घेऊन चला, मी घरी बरी होईल, असा आग्रह आजींनी धरला. पण आजींची प्रकृती पण नीट झालेली नव्हती.

घरी नेल्यास एक-दोन दिवसात काही बरे वाईट झाल्यास आम्ही जबाबदार नाही, असे डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितले. त्यामुळे आजींना घरी न्यायचे की रुग्णालयात ठेवायचे असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला.

अशात आजींच्या हट्टापायी त्यांना खाजगी रुग्णवाहिकेतून घरी नेण्यात आले. घरीच त्यांनी आयुर्वेदिक उपचार केले आणि मधूमेहाच्या आणि रक्तदाबाच्या गोळ्या सुरु ठेवल्या. पाहता पाहता आजींची ऑक्सिजनची पातळी वाढू लागली.

दोन दिवस आजी जगेल की नाही माहित नाही, अशी शाश्वती देणाऱ्या डॉक्टारांना आजीने चुकीचे ठरवले आहे. तसेच कोरोनावर मात करुन आज आजी पुर्णपणे ठणठणीत आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही करु शकतो, हे आजीने दाखवून दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: सेल्फीसाठी मिलिंद सोमनने महिलेला भररस्त्यात करायला लावले असे काही की, महिला झाली घामाघुम
मला तुझ्या कोणत्याही पार्टमध्ये इंट्रेस्ट नाही असे सांगत या अभिनेत्रीला करण जोहरने लग्नासाठी दिला नकार
सुशांतच्या निधनाला एक वर्ष पुर्ण होण्याच्या आधीच रियाने केली ‘ही’ पोस्ट, चाहते म्हणाले..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.