‘फडणवीस सरकारने काय दिवे लावलेत माहीत आहे’

 

मुंबई | राज्यातील कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. यामुळे आता विरोधी पक्ष राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहे.

राज्यात फडणवीस सरकार असते, तर कोरोनाचा मुद्दा केवळ दोन दिवसात सोडवला असता, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला आता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिले आहे. ते कोल्हापूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते.

सत्तेत असताना फडणवीस सरकारने काय दिवे लावलेत माहीत आहे, असे म्हणत वडेट्टीवार यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दोन दिवसांचा कालावधीही जास्त होईल, ते तर दोन मिनिटांतच सोडवतील असा उपहासात्मक टोलाही वडेट्टीवार यांनी पाटलांना लगावला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.