‘…तर मुख्यमंत्र्यांनी मला यातून मुक्त करावे; काँग्रेस मंत्र्याची मागणी’

 

मुंबई | सारथी संस्था आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापण्यास आता सुरवात झाली आहे.

सारथी संस्थेबद्दल वक्तव्य केल्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका सुरू आहे. आता याबाबत विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सारथी बाबत राजकारण करत माझ्या आरोप होत असतील तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून मला यातून मुक्त करा, अशी मागणी करणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

तसेच माझ्याऐवजी या पदाची जबाबदारी एखाद्या मराठा नेत्याला द्या, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

सारथी संस्थेबाबत माझी भूमिका दुटप्पी आहे, असे आरोप केले जात आहे. पण मी सारथीबद्दल कुठलीही नकारात्मक भूमिका घेतली नाही.

मी ओबीसी समाजाचा नेता असल्याने माझावर आरोप केले जात आहे, असेही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.