एकेकाळी भाडे देण्यासाठी खिशात नव्हते पैसे, आज या अलिशान गोष्टी वापरून जगतोय राजा सारखे जीवन…

दक्षिणात्य कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली. त्यांचे एका वरचढ एक चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या हिंदी डबिंग चित्रपटांना करोडो व्हिव मिळतात. त्यातीलच साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ याच्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.

विजय देवरकोंडा याने अनेक चित्रपटाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचे बॉलीवूड मधील चाहते त्याला हिंदी चित्रपटात पाहण्यासाठी आतुर झाले आहे. विजय यांनी आत्तापर्यंत खूप साऱ्या चित्रपटात काम केली आहेत पण त्यांना खरे यश ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटापासून मिळाले. हा चित्रपट २०१७ मध्ये रिलीज झाला.

करोडो रुपये कमवणारा विजय कधी काळी भाड्याच्या घरात राहत होता. कधी-कधी अशी परिस्थिती निर्माण व्हायची की भाडे द्यायला सुद्धा पैसे नव्हते. त्याने त्याच्या मेहनतीने आणि जिद्दीने करियर घडवले आहे. त्यांचा जन्म तेलगु कुटुंबात झाला.

विजय ‘राउडी’ या नावाने ओळखले जातात. जाणून आश्चर्य वाटेल की, विजयचा स्वभाव रजित असल्या कारणाने त्याला त्याच्या घरचे राउडी म्हणीन हाक मारायचे. विजयच्या वडलांनी साउथ टीव्ही सिरीयल मध्ये काम केले होते. विजयने आपल्या करीयरची सुरुवात २०११ मधील ‘नुव्विला’ चित्रपटापासून केली.

या चित्रपटानंतर त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे. २०१६ मध्ये रोमँटिक चित्रपट ‘पेली चोपुलू’ यात विजयने काम केले होते. या चित्रपटाला तेलगु मध्ये बेस्ट फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ हा ठरला.

विजय देवरकोंडाने एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपट सृष्टीत येण्याआधीचे दिवस अतिशय कठीण परिस्थितीत गेले. पैशांची टंचाई भासत असे. काही वेळा तर माझ्याकडे भाडे देण्यासाठी देखील पैसे नसायचे, परंतु मी कशी हरलो नाही मेहनत करत राहिलो. आज हाच विजय देवरकोंडा अभिनयासोबत निर्माता देखील आहे.

हे ही वाचा-

कोरोनाचा हाहाकार! गुजरातमध्ये ७१ दिवसांत १ लाख २३ हजार रुग्णांचा मृत्यु पण सरकारी आकड्यात फक्त ४ हजार

अरे बापरे! लॉकडाऊन काळात अचानक वाढली आरामदायी सोफ्यांची मागणी; कारण वाचून हैराण व्हाल

कोवीशील्ड लसीमधील अंतर सरकारने आणखीन वाढवले; जाणून घ्या यामागचं खरं कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.