Share

Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाने ‘लायगर’ चित्रपटासाठी घेतले तब्बल ‘एवढे’ कोटी, मोठमोठ्या स्टार्सला टाकले मागे

Vijay Deverakonda

Vijay Deverakonda : ‘लायगर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच तो पाहण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडा व अभिनेत्री अनन्या पांडे यांनी भूमिका साकारली आहे. हा चित्रपट आज म्हणजेच २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

विजय देवराकोंडाने ‘लायगर’ चित्रपटासाठी किती मानधन घेतले आहे हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजयने या चित्रपटासाठी तब्बल २० ते २५ कोटी रुपये मानधन घेतले आहे. या चित्रपटाचे बजेट ९० कोटींच्या जवळपास असल्याचे सांगितले जात आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ही माहिती दिली आहे.

तसेच जर बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी झाला तर विजय त्याचे मानधन वाढवणार असल्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. विजय देवराकोंडा या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट तेलुगू आणि हिंदी या दोन भाषांमध्ये आहे. संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या ठिकणी या चित्रपटाचे प्रमोशन केले जात आहे.

या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन कंपनी करणार आहे. लायगर चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. याआधी विजय देवराकोंडाने अर्जुन रेड्डी, डिअर कॉम्रेड यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती.

लायगर हा चित्रपट पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केला आहे. विजय देवराकोंडा हा प्रसिद्ध अभिनेता असून सोशल मीडियावर त्याची प्रचंड ख्याती आहे. अनेक तरुण तरुणी त्याच्या फॅन आहेत. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.

विजयच्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’ हादेखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. त्यानंतर आता त्याचा ‘लायगर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट किती कमाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या
Kanishka Soni: निर्मात्याच्या खोलीत नाही गेले म्हणून.., स्वत:शीच लग्न करणाऱ्या अभिनेत्रीने सांगितली आपबिती
Canada: नवऱ्यासोबत मिळून बहिणीवरच केला बलात्कार, क्रुरतेची कहाणी ऐकून जजही झाले हैराण
मृत्यूच्या 12 तासांनंतर एक चिमुकली अचानक जिवंत झाली आणि…, वाचून पायाखालची जमीन सरकेल
‘एकटा 32 वर्षाचा पोरगा तुमच्या अख्ख्या राजकीय कारगीर्दीला घोडे लावतोय, ते बी नांगरासकट’

मनोरंजन ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now