आरारारा राडा! १०० कोटी घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री

मुंबई |  तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार विजय देवरकोंडा करण जोहरच्या ‘लायगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. साऊथमध्ये त्याचे अर्जुन रेड्डी, डिअर कॉम्रेड, गीता गोविंदम सारखे चित्रपट खूप गाजले. यानंतर दाक्षिणात्या अभिनेता असलेला विजय देवरकोंडाला भारतभर ओळख मिळाली आहे. विजयने आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. त्यासाठी त्याने तब्बल १०० कोटींचा करार केला आहे.

विजयच्या आगामी ‘लायगर’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होत आले आहे. यामध्ये  तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ करत आहेत. विजय देवरकोंडाचा हा पहिला बॉलिवूड चित्रपट अनन्या पांड्या हिच्यासोबत येत आहे. चर्चेत असणाऱ्या या चित्रपटाचा फस्ट लूक रिलीझ झाला आहे.

‘लायगर’ हा चित्रपट ऍक्शनने भरलेला आहे. धर्मा प्रोडक्शन आणि विजय देवरकोंडा यांनी १८ जानेवारीला सोशल मीडियावर या सिनेमाचा पहिला लूक शेअर केला. लायगर सिनेमाची रिलीझ डेट अद्याप जाहीर झाली नाही. या चर्चित चित्रपटाची वाट प्रेक्षक आणि विजयचे चाहते पाहत आहेत.

विजय करणच्या धर्मा प्रोडक्शनसोबत लायगरसह तब्बल  तीन चित्रपट करणार आहे. यामध्ये ‘पैन-इंडिया’ आणि ‘बॉलिवूड’ या चित्रपटांचा समावेश असणार आहे. लायगरनंतर दुसऱ्या चित्रपटाचेही चित्रीकरण सुरू आहे. यामध्ये तो रोमाँटिक हिरोची भूमिका निभावणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘भाभीजी घर पर है’ मालिकेतील अंगूरी भाभीचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल
…अजय देवगनने अर्धवट हनीमून सोडून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला होता
रितेशचा मोठा खुलासा, म्हणाला, ‘या’ मेसेजमुळे जेनेलियासोबतचे नाते येणार होते संपुष्टात…
सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा झाला; फोटो पाहून म्हणाल, काय दिसतेय अप्सरा…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.