विजयने केला सुपस्टार रजनीकांतचा रेकॉर्ड ब्रेक? एका चित्रपटासाठी घेतले सर्वाधिक मानधन

मुंबई। सध्या बॉलीवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेज जास्त पाहायला मिळते. जिकडे तिकडे दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा पाहायला मिळत आहेत. आजकाल बॉलीवूड चित्रपटांना मागे टाकत दाक्षिणात्य कलाकारांनी लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.

अशातच सुपरस्टार विजयच्या ‘मास्टर’ या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर राज्य गाजवलं. ‘मास्टर’ या चित्रपटात थलापती विजयसोबत अभिनेता विजय सेतूपती प्रमुख भूमिकेत झळकला होता. अशातच आता अजून एका चित्रपटा निम्मित्त थलापती विजय पुन्हा चर्चेत आला आहे.

मात्र तो त्याच्या चित्रपटामुळे नाही तर, त्याच्या मानधनाबद्दल चर्चेत आला आहे. विजय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. नुकताच विजयने एका चित्रपटासाठी घेतलेले मानधन इतर अभिनेत्यांच्या तुलनेच सर्वाधिक असल्याचे म्हटले जात आहे.

कोईमोई’ने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेता विजय लवकरच ‘महर्षि’ चित्रपटातील दिग्दर्शक वामसी पैदिपल्ली यांच्या आगामी चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘थलपथी ६५’ असे आहे. व या चित्रपटासाठी विजयने १०० कोटी रुपये मानधन घेतले आहे.

पण याबाब कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सुपरस्टार रजनीकांत हे आतापर्यंतचे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. त्यांनी ‘दरबार’ चित्रपटासाठी ९० कोटी रुपये मानधन घेतले होते. मात्र जर विजयने ‘थलपथी ६५’ चित्रपटासाठी १०० कोटी मानधन घेतले तर तो सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या
‘इंडियन आयडल १२’ चे परीक्षक नेहा कक्कर व हिमेश झाले ट्रोल; लोकं म्हणाली ड्रामा करणं बंद करा..
पुण्यातला तरुण शेवग्याच्या पानांपासून चिक्की, चॉकलेट, विकून कमवतोय लाखो रुपये, जाणून घ्या..
धक्कादायक! ऑनलाइन देह व्यापार, २० हजारात मुली, व्हाट्सअँपवर होतेय डील
हीच आहे का ती भोळी भाबडी ‘गंगी’? राजश्री लांडगेचा ग्लॅमरस लुक पाहून तुमचे होश उडतील

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.