Share

Vidyadhar Karamkar : ‘उठा उठा दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली’ म्हणणाऱ्या आजोबांचे निधन, ९६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vidyadhar Karamkar

Vidyadhar Karamkar : दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी आली आहे. दिवाळी आली सर्वांना मोती साबणाची आठवण येते, कारण तेव्हा मोती साबणाची जाहिरात आपल्याला बघायला मिळते. ही जाहिरात कित्येक वर्षांपासून आपल्याला बघायला मिळत आहे. या जाहिरातीमध्ये सकाळी दार वाजवून सगळ्यांना उठवणारे आजोबा म्हणजेच जेष्ठ कलाकार विद्याधर करमकर.

पण यंदाच्या दिवाळीला ते आपल्यात नाहीत. त्यांचे दुखद निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. विद्याघर करमकर यांची हिंदी चित्रपट सृष्टीत अभिनेते म्हणून ओळखले जायचे. विद्याधर यांनी आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. मुंबईत विलेपार्ले या ठिकाणी ते राहत होते.

त्यांना आबा म्हणूनही ओळखले जायचे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी आधी त्यांनी नोकरीही केली होती. नोकरी करताना ते अभिनय क्षेत्रात काम करत होते. कार्तिक कॉलिंग कार्तिक, गेम विथ अनुमप खेर, सास बहू और सेन्सेक्स, लंच बॉक्स, एक व्हिलन, एक थी डायन या चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भुमिका निभावल्या होत्या.

विशेष म्हणजे इतके वय असतानाही त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली होती. तसेच विद्याधर करमकर यांनी अनेक जाहिरातीमध्येही काम केले होते. इंडियन ऑईल, हेज्स टॉमेटॉ केचअप, लिनोओ, एशियन पेंट, अशा वेगवेगळ्या जाहिरांतीमध्ये त्यांनी काम केले होते, पण त्यांना सर्वात जास्त प्रसिद्धी मोती साबणाच्या जाहिरातीतून मिळाली होती.

विद्याधर करमकर यांचे वय ९० असतानाही त्यांच्यात अभिनय करण्याच जोष होता. बऱ्याचदा त्यांनी त्यांची प्रकृती ठिक नसतानाही काम केले आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये वयाच्या ९६ व्यावर्षी त्यांची प्राणज्योत मावळली आहे.

महत्वाच्या बातम्या
Munawwar Rana: माझा बाप मुस्लिम होता याची मी गॅरंटी देतो पण माझी आई.., शायर मुनव्वर राणांचे पुन्हा विचित्र वक्तव्य
Sanjay Dutt: संजय दत्तने अशा प्रकारे ठेवले ३५० हून अधिक मुलींशी शारीरिक संबंध, आधी आश्वासने द्यायचा मग..
Gifts: बुर्ज खलिफात फ्लॅट ते आलिशान कार, महागड्या भेटवस्तुंच्या नावावर पाण्यासारखा पैसा खर्च करतात ‘हे’ स्टार्स

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now