‘द डर्टी पिक्चर’ बघितल्यानंतर विद्या बालनच्या आई वडीलांनी दिली होती ‘अशी’ प्रतिक्रिया

विद्या बालन इंडस्ट्रीतील प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आजपर्यंत तिच्या अभिनय कौशल्याने अनेक भुमिका जिवंत केल्या आहेत. स्त्रीप्रधान चित्रपटांसाठी विद्या दिग्दर्शकांची पहीली पसंत आहे. ती तिच्या दमदार स्त्री भुमिकांसाठी ओळखली जाते.

काही दिवसांपूर्वीच विद्या बालनचा शकूंतलादेवी हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले होते. चित्रपटांसोबतच विद्याने अनेक वर्ष टेलिव्हिजनवर देखील काम केले आहे. हम पाच या मालिकेतून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भुमिका केल्यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. विद्या तिच्या अभिनय कौशल्यामूळे अनेक चित्रपटांध्ये काम मिळत होते. तिने तिच्या करिअरमध्ये सुपरहिट चित्रपट दिले आहेत आणि आज ती इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री आहे.

उत्तम अभिनयासोबत ती तिच्या बोल्ड लुकसाठी देखील ओळखी जाते. २०११ मध्ये रिलीज झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटांमध्ये तिने अनेक बोल्ड सीन्स दिले होते. या चित्रपटानंतर विद्याला इंडस्ट्रीमध्ये बोल्ड अभिनेत्रीची जागा मिळाली होती.

द डर्टी पिक्चरने बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड तोडले होते. चित्रपटातील बोल्ड सीन्समूळे त्यावेळी खुप जास्त वाद झाले होते. विद्या बालनला तिच्या आई वडीलांच्या प्रतिक्रिया काय असेल हा प्रश्न सतावत होता. एवढ्या वर्षांनंतर तिने या गोष्टीचा खुलासा केला आहे.

द डर्टी पिक्चरच्या प्रिमिअरच्या दिवशी विद्या खुप टेन्शनमध्ये होती. चित्रपट पाहील्यानंतर आई वडील कशी प्रतिक्रिया देतील या गोष्टीचे टेन्शन तिला आले होते. त्यामूळे ती चित्रपट संपण्याची वाट बघत होती.

विद्या म्हणाली की, चित्रपट संपल्यानतर माझे वडील टाळ्या वाजवत होते. तर माझी आई रडत होती. चित्रपटामध्ये माझा मृत्यू होतो ही गोष्ट माझ्या आईला सहन झाली नाही. म्हणून तिने रडायला सुरुवात केली होती.

विद्याने पुढे सांगितले की, माझ्या आई वडीलांना हा चित्रपट अश्लील वाटला नाही. त्यांनी माझे काम बघितले आणि मला समजून घेतले. माझ्यासाठी ही खुप मोठी गोष्ट आहे. त्यामूळे मी त्यांची खुप आभारी आहे. त्यांच्यामूळेच मी बॉलीवूडमध्ये एवढी पुढे जाऊ शकले.

महत्वाच्या बातम्या –

अभिज्ञा भावेचा रेट्रो लुक ठरला सोशल मिडीयावर चर्चेचा विषय; पहा फोटो

‘आशिका बनाया आपने’ फेम तनूश्री दत्ताचा हॉट अंदाज; इंग्रजी गाण्यावर डान्स करताना व्हिडीओ झाला व्हायरल

नशेत धुंद धर्मेंद्रने मंत्र्याच्या पत्नीला केले होते जबरदस्ती किस; झाला होता मोठा तमाशा

नेहा पेंडसेला साडीमध्ये पाहून चाहत्यांच्या हृदयाची ठोके वाढले; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.