…म्हणून विद्या बालनने सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला

फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात गुणी अभिनेत्री म्हणून विद्या बालनला ओळखले जाते. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होत असतात. ती बॉलीवूडची सर्वात प्रभावशाली अभिनेत्री आहे.

विद्या बालनचा काही दिवसांपूर्वीच शकूंतलादेवी हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले होते. चित्रपटांसोबतच विद्याने अनेक वर्ष टेलिव्हिजनवर देखील काम केले आहे. हम पाच या मालिकेतून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भुमिका केल्यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. विद्या तिच्या अभिनय कौशल्यामूळे अनेक चित्रपटांध्ये काम मिळत होते. तिने तिच्या करिअरमध्ये सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आज ती इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री आहे.

विद्या तिच्या व्यक्तिक आयूष्यामूळे देखील अनेकदा चर्चेत असते. तिने निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाला आठ वर्ष झाली आहेत. तरीही दोघे सुखाने संसार करत आहेत. विद्या ४२ वर्षांची आहे. पण ती अजूनही आई झालेली नाही.

दोघांची भेट एका अवॉर्ड फंक्शनमध्ये झाली होती. पहील्या भेटीत सिद्धार्थ विद्याच्या प्रेमात पडला होता. म्हणून त्याने करण जोहरच्या मदतीने परत एकदा विद्याला भेटण्याचा प्लॅन केला. दोघांच्या भेटी वाढत गेल्या. दोघे एकमेकांना डेट करु लागले.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १४ डिसेंबर २०१२ मध्ये दोघांनी लग्न केले. विद्या बालन सिद्धार्थची तिसरी पत्नी आहे. ह्याबद्दल खुप कमी लोकांना माहीती आहे. पण विद्याच्या अगोदर सिद्धार्थची दोन लग्न झाली होती. विद्या त्याची तिसरी पत्नी आहे.

सिद्धार्थचे पहीले लग्न त्याची लहानपणीची मैत्रीण आरती बजाजसोबत झाले होते. दोघांना एक मुलगा आहे. पण त्यांचे लग्न जास्त काळ टिकले नाही. त्यानंतर प्रोड्यूसर कवितासोबत त्याचे दुसरे लग्न झाले होते. पण हे ही लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. दोघांचा घटस्फोट झाला.

सिद्धार्थसोबत तिसरे लग्न केल्यानंतर विद्याला खुप ट्रोल करण्यात आले होते. तिसरी पत्नी बनण्यावर विद्याने आपले मत मांडले होते. ती म्हणाली होती, ‘सिद्धार्थचे या अगोदर दोन लग्न झाले आहेत. पण ते जास्त काळ टिकू शकली नाहीत. याचा अर्थ असा नाही की तो वाईट आहे. अनेकदा नाते टिकत नाही. म्हणून आपण माणसांना दोष द्यायचा का?’

त्यासोबतच तिने पुढे सांगितले की, ‘मी माझ्या आयूष्यात जे प्रेम शोधत होते. सिद्धार्थने मला त्यापेक्षाही अधिक प्रेम दिले. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तिच्या प्रेमात पडतो. त्यावेळी आपण त्या व्यक्तिचा कोणत्याही अटी शिवाय स्वीकार करतो. हेच प्रेम असते. मला ते प्रेम मिळाले म्हणून मी लग्न केले’.

महत्त्वाच्या बातम्या –

..म्हणून नर्गिस यांनी मीना कुमारी ह्यांचे पार्थिव शरीर बघून रडण्याऐवजी त्यांना दिल्या होत्या मृत्यूच्या शुभेच्छा

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली; शस्त्रक्रियेबद्दल दिली माहिती…

अक्षय कुमारच्या प्रेमात पागल झालेल्या शिल्पा शेट्टीने उचलले होते ‘हे’ टोकाचे पाऊल

‘कारभारी लयभारी’ या मराठी मालिकेतील प्रसिध्द अभिनेत्रीला भररस्त्यात मारहाण, पाहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.