VIDEO: रियल हिरो सोनू सूद करतोय साकलवरून ब्रेड, अंड्यांची होम डिलिव्हरी

मुंबई। चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता सोनू सूद खऱ्या आयुष्यात अनेकांचा दबंग हिरो बनला आहे. त्याने गेले वर्षभर कोरोना काळात स्वखर्चाने अनेकांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे तो खऱ्या आयुष्यातील अनेकांचा रियल हिरो बनला आहे.

अशातच सोनूने आता एक नवीन व्यवसाय सूरू केला आहे. सोनूने या संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्यवसायाचं नाव ‘सूद की सुपरमार्केट’ असं आहे.

शेअर केलेल्या या व्हिडीओला सोनूने ‘मोफत होम डिलिव्हरी, १० अंडी विकत घेणाऱ्यास एक ब्रेडचं पॅकेट मोफत’, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. तसेच या व्हिडीओमध्ये सोनू म्हणाला आहे की, “कोण म्हणालं की मॉल बंद झाले? सर्वांत महत्त्वाचा आणि सर्वांत महागडं सुपरमार्केट आता तयार आहे.

हे पहा, माझ्याकडे सर्वकाही आहे. प्रत्येकी सहा रुपयांची अंडी आहेत, ४० रुपयांचा ब्रेडचा पुडा आहे, छोट्या ब्रेडचा पुडा २२ रुपयांना आहे. सोबतच पाव, खारी, रस्क आणि खूप सारे चिप्ससुद्धा आहेत”, असं तो या व्हिडीओत म्हणताना दिसतोय.

हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी सोनूचे कौतुक केलं आहे. आतापर्यंत तब्बल १८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काहींनी सोनूला आशीर्वादसुद्धा दिला आहे.

सोनू सूदची कोरोना संकटातील मदत गरजूना केलेली मदत पाहता सोनू सूद अनेकांसाठी देवदूत बनला आहे. त्यामुळे जरी सोनू चित्रपटांमध्ये खलनायकाचे काम करत असला तरी तो खऱ्या आयुष्यात अनेकांचा रिअल हिरो आहे.

महत्वाच्या बातम्या
मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत पळून जाऊन केलं लग्न, मात्र आता दोघांना जीवे मारण्याच्या धमक्या सूरू
बाबो! गुजरातचं आकाश अचानक उजळल्यानं घबराट,एलियन असल्याचा लोकांचा अंदाज
बॅंकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून बॉलीवूडमध्ये नाव करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत होत्या रिमा लागू
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपद काँग्रेसकडे, अध्यक्षपदासाठी या मोठ्या नावाची चर्चा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.