Share

राहूल गांधींचा नाईट क्लबमध्ये ड्रिंक्स घेतानाचा व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते म्हणतात ते चीनच्या एजंटांसोबत…

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओवरून राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना ट्रोल केलं जात आहे.(Video Rahul Gandhi having drinks in a nightclub goes viral)

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ काठमांडू शहरातील एका नाईट क्लबमधील आहे. या नाईट क्लबचे नाव लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स असे आहे. या नाईट क्लबमधील राहुल गांधी यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ड्रिंक्स घेताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच भाजप नेत्यांनी काँग्रेस पक्षावर देखील टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, राहुल गांधी काय करतात ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. पण राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. सध्या जोधपूरमध्ये हिंसाचार उसळला असताना चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी नेपाळमधील नाईट क्लबमध्ये पार्टी करत आहेत”, अशी टीका भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केली आहे.

भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी देखील ट्विट करत म्हटले आहे की, हा राहुल गांधींच्या वैयक्तिक आयुष्याचा विषय नाही. राहुल गांधी कोणासोबत आहेत? ते चीनच्या एजंट सोबत आहेत का? राहुल गांधींनी लष्कराविरोधात जे ट्विट केले ते चीनच्या दबावाखाली आहे का? “, असा सवाल कपिल मिश्रा यांनी उपस्थित केला आहे.

यासोबतच राहुल गांधी यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी नाईट क्लबमध्ये मोबाइलमध्ये काहीतरी पाहत असल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी मैत्रिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी काठमांडूला गेले आहेत. राहुल गांधी सध्या काठमांडूमधील मॅरियट हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर परदेश दौऱ्यावरून टीका केली होती. आता राहुल गांधी यांचा नाईट क्लबमध्ये पार्टी करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांना धारेवर धरण्यास सुरवात केली आहे. या व्हिडिओवरून अनेकांनी राहुल गांधी यांना ट्रोल केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजच्या आज करा बंपर खरेदी
‘सलाम नमस्ते’मध्ये दिसला होता अर्शद वारसीचा मुलगा, 17 वर्षांनंतर दिसतोय ‘असा’, पहा फोटो
आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी अपेक्षा बाळगते, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now