भविष्यवाणी करणाऱ्या रशियन मांजरीचा व्हिडिओ व्हायरल, एकदा व्हिडिओ पहाच

अनेकांना आपलं भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता असते. अनेकजण जण भविष्य जाणून घेण्यासाठी अनेक साधू मंडळींकडे जातात. काहीजण पैसे देऊन आपलं भविष्य बघतात. मात्र रशियात अशी एक मांजर आहे, जी गेले कित्येक वर्ष भविष्यवाणी करत आहे. आपला विश्वास बसत नसेल पण हे खरं आहे.

या मांजराचं नाव Achilles असं असून तिला ऐकू येत नाही. रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमधील हर्मिटेज मुझियममध्ये ही मांजर राहते. गेले कित्येक वर्ष ही मांजर भाकीत करत आहे. व तिचा आता व्हिडिओ समोर आला आहे.

जागतिक फुटबॉलमधील महत्त्वाची स्पर्धा असणाऱ्या युरो चषकाचे सामने मोठ्या चुरशीत सुरु आहेत. पहिल्या दिवशीपासूनच रंगदार सामने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या दरम्यान चुरशीच्या सामन्यांत कोणता संघ विजयी होणार याचं भाकित करणारी ही मांजर आहे.

मात्र या मांजरीची भविष्यवाणी करण्याची पद्धत निराळीच आहे. तिच्यासमोर दोन वाट्यांमध्ये खाऊ ठेवला जातो. प्रत्येक वाटजवळ सामना असणाऱ्या संघाचा झेंडा लावला जातो. त्यानंतर ही मांजर कोणत्याही एका वाटीतील खाऊ आधी खाते आणि तोच संघ विजयी होतो.

तिने 2017 सालच्या Confederations Cup मधील सामन्यांची भविष्यवाणी देखील या मांजरीने केली होती. त्यादरम्यानही तिचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर आता युरो चषकाच्या सामन्यादरम्यानचे तिचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

2018 मध्ये फिफा विश्वचषकातील सुरुवातीची मॅच रशिया जिंकेल अशी भविष्यवाणीही Achilles ने केली होती, जी खरी ठरली. त्यानंतर आता युरो चषकाच्या पहिल्या मॅचमध्येही इटलीने टर्कीला पराभूत केलं. त्यानंतर बेल्जियमने रशियाला धूळ चारली. या सामन्यांच भाकितही Achilles ने आधीच केलं होतं जे अगदी बरोबर ठरलं.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.