जीव गेला तरी बेहत्तर, पण व्यसन जाणार नाही! व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा तंबाखु मळतानाचा विडिओ बघाच

नवी दिल्ली । कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. असे असताना देखील अनेकजण विनामास्क नियम न पाळत फिरत आहेत. नियमांचे उल्लंघन करत आहेत. यामुळे कोरोनाचे प्रमाण वाढत आहेत. यातच आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे.

काहीजण तर रुग्णालयात देखील नियम पाळत नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्यक्ती व्हेंटिलेटरवर आहे, मात्र हा हातामध्ये तंबाखू मळत आहे.

काहींना हा व्हिडिओ बघून हसू येत आहे. हा विचार करायला लावणारा विडिओ आहे. काहींनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडिओमध्ये गंभीर असलेला एक व्हेंटिलेटरवरील रुग्ण दिसत आहे. त्याच्या तोंडामध्ये ऑक्सिजन पाईप आहे.

या व्यक्तीजवळ नर्सही आहे. मात्र, तो स्वतःच्याच नादात व्यस्त आहे. हा व्हायरल व्हिडिओ आयपीएस ऑफिसर रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. सध्या सगळीकडे हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

त्यांनी लिहिले आहे की, दुसरी गरजेची गोष्ट. ‘छोड़ेंगे न तेरा साथ, मरते दम तक, दारु अजूनही लिस्टमध्ये टॉपवर आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये छोड़ेंगे न साथ तेरा साथी मरते दम तक हे गाणं सुरू आहे.

आपण बघत असतो की तंबाखूचे व्यसन अनेकांना असते. अनेकांना ते सोडायची देखील इच्छा असते मात्र ती सहजपणे सुटत नाही. या व्हिडिओमधून सुध्दा हेच दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार?; आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी सांगितली तारीख

ऐन कोरोनाच्या संकटात मुकेश अंबानीची ब्रिटनमध्ये फुल्ल टू शॉपिंग; ५९२ कोटींचा रिसॉर्ट केला खरेदी

गायिका सुनिधी चौहानने आपल्या नवऱ्यासोबत सुरु असलेल्या वादावर सोडले मौन; म्हणाली…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.