Video; चिडलेल्या हत्तीने केळीची संपूर्ण बाग उध्वस्त केली, मात्र एक झाड सोडले, कारण ऐकल्यावर अवाक व्हाल

हत्ती हा प्राणी म्हटलं की शरीराने मोठा, प्रेमळ पण वेळप्रसंगी तेवढाच रागीट असा हा प्राणी. हत्तीला देखील भावना असतात. याचीच प्रचिती तामिळनाडूमध्ये आली. या हत्तीने एका गावात मोठ्या प्रमाणात नासधूस केली. यामुळे काहीवेळ गोंधळ निर्माण झाला.

या हत्तीने शेतातील केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त केली. या हत्तीने केळीची सर्व झाडे मुळापासून उखडून टाकली. तर काही झाडांना खोडापासून तोडून फेकले. आता एकही झाड राहणार नाही अशी शक्यता असताना तो हत्ती अचानक थांबला.

त्याने संपूर्ण बागेत फक्त एक केळीचे झाड तसेच ठेवले. या हत्तीने केळीच्या त्या झाडाला साधा धक्कासुद्धा लावला नाही. हे झाड त्याने का तोडले नाही, असा सर्वजण विचार करत होते. यानंतर हा शेतकरी त्या झाडाजवळ गेला.

यावेळी त्यांना एक गोष्ट सापडली. त्या केळीच्या झाडावर एका पक्ष्याने आपले घरट बांधले होते. त्या घरट्यात पिलं होती. ती पिलं नुकतीच जन्मली होती. या पिलांना कोणतीही इजा होऊ नये. म्हणून या हत्तीने घरटं असलेल्या केळीच्या झाडाला धक्कासुद्धा लावला नाही. यामुळे तेथे उपस्थित असणाऱ्यानी आश्चर्य व्यक्त केले.

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी हत्तीच्या या संवेदनशीलतेचे तोंडभरून कौतूक केले आहे. प्राणी सुध्दा भावना समजू शकतात. हे यानिमित्ताने दिसून आले आहे. ही घटना घडल्यानंतर त्याची दखल थेट आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी घेतली.

त्यांनी तामिळनाडूच्या स्थानिक वृत्तवाहीनीने केलेल्या वृत्तांकनाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यावर अनेकांनी या हत्तीचे कौतुक केले आहे. सध्या हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

घरकाम करणाऱ्या महिलेच्या आकांताने पोलिसांनाही फुटला पाझर; वाचा पुर्ण किस्सा

सलमानच्या राधे चित्रपटाने घातला धुमाकूळ, पहिल्याच दिवशी सर्व रेकॉर्ड तोडत कमवले ‘इतके’ कोटी

चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केलाय; आता भाजप खासदारानेच टोचले मोदींचे कान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.