Share

VIDEO: धोनीला भेटताच रडू लागली दिव्यांग चाहती, धोनीने धीर देत केलं असं काही की चाहतेही भावूक

आंतरराष्ट्रीय मैदानातून निवृत्त झालेला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार त्याच्या चाहत्यांना आकर्षित करत आहे. रांची विमान तळावर अशी एक घटना मंगळवारी घडली आहे. एम एस धोनी चेन्नईला जाण्यासाठी विमानतळावर उपस्थित झाला होता.

माजी कर्णधार एम एस धोनीची इमोशनल बाजू जगासमोर आल्याचं पहायला मिळालं आहे. एम एस धोनीला रांची विमान तळावर त्याच्या अपंग चाहती लावण्या भेटली होती. धोनीसोबतच्या या भेटीचा अनुभव लावण्याने सगळ्यांना  शेअर केला आहे.

इन्स्टाग्रामवर लावण्याने धोनीसोबतच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. लावण्या धोनीला पााहून रडायला लागली होती. धोनीने लावण्याचे अश्रू पुसले आहेत आणि लावण्याला धोनीने सांगितले आहे की, रडू नकोस असे सांगितले आहे.

भारताला २ वर्ल्डकप आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणारा धोनीने लावण्याची रांची विमान तळावर भेट घेतली आहे. लावण्या पिलानियाने भेटीमध्ये धोनीला त्याचं एक स्केच गिफ्ट दिलं आहे. लावण्याने सांगितले आहे की, मी हे गिफ्ट घेऊन जाईन.

धोनीला भेटल्याची भावना लावण्या शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. लावण्याने म्हटलं आहे की, एम एस धोनी मृदुभाषी आहे. धोनीने लावण्याला तिच्याचं नावाचं स्पेलिंग विचारलं  आहे. असे लावण्याने धोनीच्या भेटीबद्दल सांगितले आहे.

लावण्याने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले की, मी जेव्हा त्याला पाहून रडायला लागले तेव्हा त्याने मला रडू नकोस, असं सांगितलं आणि माझे अश्रू पुसले. मी दिलेल्या स्केचबद्दल तो मला धन्यवाद म्हणाला, तसंच हे गिफ्ट मी घेऊन जातोय, असंही त्याने मला सांगितलं. त्याचे हे शब्द कायमच माझ्या आठवणीत राहतील,’ असं लावण्याने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या:-
हार्टअटॅकआधी केकेला जाणवली होती ‘ही’ लक्षणे, तुम्हीही ‘या’ ७ लक्षणांकडे कधीच नका करु दुर्लक्ष
मृत्यूनंतर पाठीमागे ‘इतक्या’ कोटींची संपत्ती सोडून गेला केके; एका गाण्याचे मानधन ऐकून डोळे पांढरे होतील
ट्रॉफी जिंकताच हार्दिक पांड्याचं घरी झालं जंगी स्वागत, भाऊ क्रुणालने ‘अशी’ केली होती तयारी

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now