बाॅक्सरचा तो व्हिडीओ पाहून महींद्रा झाले फिदा; केली स्टार्टअपसाठी मदत करण्याची घोषणा

उद्योजक आनंद महिंद्रा हे त्यांच्या सोशल नेटवर्किंगवरील पोस्टमुळे सतत चर्चेत असतात. अनेकांना ते सतत मदत करत असतात. आता त्यांनी एका माजी बॉक्सरपटूसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यामुळे त्याचे नशीबच बदलले आहे.

गरिबीमुळे रिक्षा चालवण्याची वेळ राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर असणाऱ्या आबिद खान यांच्यावर आली आहे. आता त्यांना बॉक्सिंग अकादमी स्थापन करुन देण्यासाठी आपण काय मदत करु शकतो, अशी विचारणा आनंद महिंद्रांनी केली आहे.

ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी ही विचारणा केली आहे. सोशल मीडियावर आबिद खान यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कष्ट करुन उपजीविका भागवणाऱ्या खेळाडूंचा संघर्ष जगासमोर आणणाऱ्या एका युट्यूब चॅनेलने केलेल्या आदिब यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.

यामध्ये आंनद महिंद्रा म्हणाले की धन्यवाद सौरभ, तू आम्हाला आदिबची संघर्षकथा सांगितलीस. खास करुन ते निवेदन न करता स्वत: कष्ट करत आहेत हे कौतुकास्पद आहे. मी सुद्धा दान करण्याऐवजी लोकांचे कौशल्य आणि आवड यामध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतो.

मी आदिबच्या बॉक्सिंग अकदामीच्या स्टार्टअपला कसा हातभार लावू शकतो यासंदर्भात मला कोणीतरी कृपा करुन मदत करा, असे ट्विट त्यांनी केले आहे. यामुळे आता त्यांना मदत मिळणार आहे.

यापूर्वी देखील आंनद महिंद्रा यांनी अनेकांना मोठी मदत केली आहे. यामुळे अनेकांचे आयुष्य बदलले आहे. आबिद खान राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंगपटू असून सध्या ते जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. आनंद महिंद्रांनी आबिद यांना बॉक्सिंग अकदामी स्थापन करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.