VIDEO; बस सावकाश चालवण्यास सांगितल्यानं एस. टी. कर्मचाऱ्यांकडून वयोवृद्ध दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

पालघर। बरेचसे लोक रोजच्या धावपळीच्या जीवनात एस. टी. बसनं प्रवास करणं सोयीचं समजत असतात. कारण एस. टी. बस म्हणजेच लालपरी ही सामान्यांच्या जीवनातील प्रवासाचे महत्वाचे साधन आहे. त्यामुळे नागरिक एस. टी. बसने प्रवास करत असतात. मात्र एस. टी. बसला रोज प्रचंड गर्दी असते.
त्यामुळे बऱ्याचदा गर्दीच्या ठिकाणी रोज  बसमध्ये वाद विवाद होत असतात. अनेकदा हे वाद सुट्ट्या पैशांपासून तर अगदी तिकीट घेण्यासाठी वाहक एका जागेवर बसून प्रवाशांनाच आपल्याकडे बोलावतो म्हणून होतो. म्हणजे अगदी छोटया कारणांवरून छोटेमोठे वाद हे होत असतात.
मात्र सध्या अशी एक घटना समोर आली आहे. जी पाहून या घटनेचा प्रचंड राग येईल. आणि या घटनेचा सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. सध्या पावसामुळे रस्त्यांना प्रचंड खड्डे आहेत. काही ठिकाणी तर रस्तेच खराब आहेत. त्यामुळे याचा त्रास वयोवृद्ध लोकांना प्रवास करताना प्रचंड होतो.
अशाच एका वयोवृद्ध दाम्पत्यानं केवळ रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बस सावकास चालवण्यासाठी सांगितल्याचा राग येऊन कर्मचाऱ्यांनी त्या वयोवृद्ध दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना पालघर मधील असून त्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय.

एका वयोवृद्ध दाम्पत्याने तब्येतीच्या कारणास्तव आणि खड्ड्यांमध्ये गाडी आदळून होणाऱ्या त्रासामुळे कर्मचाऱ्यांना बस सावकाश चालवण्यास सांगितलं. मात्र त्यांच्या या सूचनेचा राग येऊन बस चालक गोरखनाथ नागरगोजे आणि वाहक महिला शीतल नितीन पवार या आरोपींनी वयोवृद्धाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. व हे सर्व कॅमेऱ्यात कैद झाले आहे. आरोपी कर्मचारी दोघेही बोईसर बस डेपोत काम करतात.
या कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की,  वयोवृद्ध जोडपं एसटी स्टँडवर चालत जात असताना महिला वाहक मागून येऊन वृद्धाची कॉलर पकडून धक्काबुक्की करण्यास सुरुवात करते. त्यानंतर ही महिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास करते.
वृद्धाची पत्नी या महिलेला रोखण्याचा प्रयत्न करते मात्र ती त्यानंतरही मारहाण सुरूच ठेवते. सोबत चालकाने जोराने वृद्धाला ओढून बस स्थानकाच्या साठलेल्या खराब पाण्यात पाडल्याचंही या सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसतंय. अनेकजण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र  चालक आणि वाहक शिवीगाळ करतानाही दिसत आहेत. आता या घडलेल्या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
वहिणी रॉक वऱ्हाडी शॉक! भरलग्नात वहिणीने दिराचा जबरदस्ती हात पकडला अन्…; पहा व्हिडिओ
गणपतराव देशमुख: पांढरा शर्ट, हातात एक बॅग आणि बसमध्ये प्रवास करणारे एकमेव आमदार, वाचा त्यांच्याबद्दल..
इंडियन आयडॉल १२ च्या या आठवड्यात दोन स्पर्धक होणार एलिमिनेट? नाव ऐकून व्हाल चकित..
‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेच्या टीमने कोकणवासियांसाठी केली कळकळीची विनंती; व्हिडिओ पाहून येईल डोळ्यात पाणी
 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.