VIDEO: प्रविण तरडेंचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ‘मुळशी पॅटर्न’ स्टाईलने सल्ला, म्हणाले..

‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे दिग्दर्शक(Director) आणि अभिनेते प्रविण तरडे(Pravin Tarade) यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रविण तरडे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ‘शेती राखायची असती आणि राखलेली शेती कसायची पण असती’ असा सल्ला दिला आहे. दिग्दर्शक प्रविण तरडे स्वतः च्या शेतात गेले होते. त्यावेळी त्यांचे वडील शेतामध्ये काम करत होते.(video-actor pravin tarde give advice to farmer)

वडील शेतात काम करत असताना अभिनेते प्रविण तरडे यांनी एक व्हिडिओ शूट केला. तो व्हिडिओ प्रविण तरडे यांनी फेसबुकवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती सांगितली आहे आणि या परिस्थितीतून शेतकऱ्यांनी कसे बाहेर पडावे? याचा मार्ग देखील सांगितला आहे.

दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी व्हिडिओमध्ये म्हंटले आहे की, “राज्यातील शेतकऱ्यांनी(Farmer) कायम एक लक्षात ठेवलं पाहिजे की कितीही संकटं आली तर खचायचं नाही. शेती करत राहायची कारण शेती विकायची नसते. शेती राखायची असते आणि सोबतच राखलेली शेती कसायची असते”, असा सल्ला दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत न खचता शेती करायला पाहिजे, असे अभिनेते प्रविण तरडे यांनी व्हिडिओमध्ये म्हंटले आहे. हा व्हिडिओ प्रविण तरडे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे कुटुंबियांसोबत आपल्या शेतात गेले होते. त्यावेळी त्यांचे वडील शेतात काम करत होते.

या व्हिडिओमध्ये अभिनेते प्रविण तरडे पुढे म्हणाले की, “माझ्या वडिलांनी पाच किलो वाटाणा पेरला. पण रोग पडल्यामुळे हाती केवळ अर्धा किलो वाटाणा मिळाला. पण तरी देखील माझे वडील शेती करतात. तसंच तुम्ही सुद्धा शेती करा, असा सल्ला प्रविण तरडे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिला आहे.

दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे यांनी शेतकऱ्यांना सल्ला देत असताना त्यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील डायलॉग्स वापरला आहे. अभिनेते प्रविण तरडे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर लोकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांनी दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे यांचे कौतुक केले आहे.

https://www.facebook.com/100000338537393/videos/533245808284487/

महत्वाच्या बातम्या :-
राफेलचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर: भारतापेक्षा कमी खर्चात इंडोनेशियाने विकत घेतली ४२ राफेल विमानं
मुलगी झाल्याचा आनंद गगणात मावेना, शेतकऱ्याने पुर्ण गावात वाटली तब्बल दीड क्विंटल जिलेबी
चारा घोटाळ्याप्रकरणी पुन्हा अडचणी वाढल्या! लालू प्रसाद यादव 139 कोटींच्या चारा घोटाळाप्रकरणी दोषी