अश्लील मॅसेज करतो म्हणून महिलेने केली बॉसची धूलाई; व्हिडिओ व्हायरल

 

 

अनेकदा महिलांसोबत ऑफिसमध्ये गैरवर्तवणुकीचे प्रकार घडत असतात. आता एका बॉसला आपल्या महिला कर्मचाऱ्याला अश्लील मॅसेज पाठवणे चांगलेच महागात पडले आहे. कारण त्या महिलेने बॉसची चांगलीच धुलाई केली आहे.

महिला कर्मचाऱ्याने बॉसला मारलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये तिने बॉसवर गंभीर आरोप करत त्याची धुलाई केली आहे. विशेष हा व्हिडिओ स्वत: त्या महिलेने शुट केला आहे.

ही महिला सरकारी कर्मचारी आहे, तिला तिचा बॉस सतत त्रास देत होता. तो तिला नेहमी अश्लील मॅसेज पाठवायचा. त्यामुळे संतापून त्या महिला कर्मचाऱ्याने बॉसला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्या बॉसला चांगलाच चोप दिला आहे.

या महिलेचे नाव जोऊ असे असून तिच्या बॉसचे नाव वँग आहे. या व्हिडिओ दिसून येते की जोऊ प्रचंड संतापली आहे. त्यामुळे ती आधी एका भांड्यात पाणी घेऊन त्याच्या तोंडावर मारते आणि त्यानंतर ती एका झाडूने बॉसला मारहाण करण्यास सुरुवात करते.

त्यानंतर तो बॉस तिची माफी मागत आहे. तसेच मी तर मजाक करत होतो, असे तो म्हणत आहे. पण कोणी अशी मजाक कशी करु शकतो? असा प्रश्न तिने बॉसला विचारला आहे. तसेच तुझे चरित्र खुप घाणेरडे आहे, असेही ती म्हणते.

बॉसला मारहाण केलेला हा पुर्ण व्हिडिओ १४ मिनिटांचा आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून त्या महिलेचे सर्वजण कौतूक करत आहे. तर काही लोकांनी कमेंट करत अशा बॉसला अशीच शिक्षा मिळाली पाहिजे, असेही म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

विद्युत कर्मचाऱ्याने पेट्रोल बाईकला बनवले इलेक्ट्रिक, फक्त सात रूपयांत चालते ३५ किलोमीटर

“राष्ट्रवादी हुशार, गृहमंत्री गरीब तोंडाचा पाहतात, ज्यामुळे चिल्लर त्याला आणि नोटा मात्र बारामतीला”

पदार्पणातच धमाका करणाऱ्या आयपीएलच्या ‘या’ खेळाडूला अभिनेत्रीसोबत जायचय डेटवर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.