‘बाबा चमत्कार’ काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं निधन

‘झपाटलेल्या’ या मराठी चित्रपटात बाबा चमत्कारची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. ते पुण्यात बावधन परिसरात राहत होते.

राघवेंद्र कडकोळ यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांच्या गाजलेल्या अभिनयामुळे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.

झपाटलेल्या चित्रपटातील बाबा चमत्कारची भूमिका आणि ‘ओम फट् स्वाहा’ हा मंत्र गाजला होता. या चित्रपटात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जय शिवराय! देवरूखात साकारले अवघे ३ सेंटिमीटरमध्ये शिवराय; विलासचा सर्वात लहान रांगोळीचा विश्वविक्रम
मॉडेलचे कपडे बघून फ्लाईट अटेंडेंटला वाटली लाज, स्व:ताचे जॅकेट काढून दिले आणि…
…आणि एलियनसारखं दिसण्यासाठी त्याने आपले ओठ, कान, नाक कापले
दोस्ती असावी तर अशी! चिमुकला जंगलात फिरायला गेला आणि नवीन मित्राला घेऊन आला 

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.