व्हेंटिलेटर घोटाळा: एका व्हेंटिलेटरची किंमत दीड लाख असताना केंद्र सरकारने अडीच लाख जास्तीचे का खर्च केले?-काँग्रेस

दिल्ली | पीएम केअर फंडातून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यात आलं आहे. या साहित्यात केंद्र सरकारने घोटाळा केल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

“भाजपचं गणित कच्च आहे का यातही काही डाव आहे ? केंद्र सरकारने व्हेंटिलेटरची किंमत दीड लाख रुपये असताना अडीच लाख रुपये जास्तीचे का दिले ?” असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.

भारत देशात कोरोना पसरल्यानंतर आर्थिकदृष्ट्या वस्तूंचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे आरोग्य सुविधांवर प्रचंड ताण पडत होता. कोरोनाच्या काळात विविध स्तरांवर काम करण्यासाठी मोदी सरकारने पीएम केअर फंड सुरू केलं होतं.

याच फंडातून व्हेंटिलेटरर्स खरेदी करण्यात आले आहेत. पण काँग्रेसचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्हेंटिलेटरवर सरकारने ४ लाख रुपये खर्च केले आहेत. पुरवठा करणाऱ्याने व्हेंटिलेटरची किंमत दिड लाख नोंदवली आहे.

मग केंद्र सरकारने प्रत्येक व्हेंटिलेटरवर अडीच लाख रुपये जास्त का खर्च केले ? भाजपचं गणित कच्च आहे की यातही काहीतरी डाव आहे. असं पोस्टर त्यांनी ट्विटरच्या अधिकृत अकाऊंटवर टाकलं आहे.

दरम्यान, काँग्रेसने अजून एक प्रश्न उपस्थित केला आहे की, प्रतिष्ठित डॉक्टरांनी ज्या व्हेंटिलेटर कंपनीला खराब सांगितले आहे त्याच व्हेंटिलेटर बनवण्याऱ्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट का देण्यात आले ?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.