लवकर पीयुसी काढून घ्या! सरकारने पीयुसी दंडांच्या रकमेत केली प्रचंड वाढ; जाणून घ्या..

सरकारने ट्राफिकसंदर्भात नवीन नियम काढला आहे. नियम तसा जुनाच आहे पण त्याच्यामध्ये बदल करण्यात आला आहे. जर तुम्ही गाडीचा PUC काढला नसेल तर आजच काढून घ्या. कारण जर तुम्ही बिना PUC गाडी रस्त्यावर आणली तर तुम्हाला मोठा भुर्दंड बसणार आहे.

जर तुमच्याकडे PUC नसेल तर तुम्हाला १० हजार रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. मागील वर्षी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने नियमात बदल केला होता. आता याच दंडाच्या रकमेत १० पटीने वाढ करण्यात आली आहे.

पूर्वी फक्त १००० रुपये दंड होता. पियुसी म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल. PUC म्हणजे जेव्हा गाडी प्रदूषण नियंत्रणाच्या मानदंडाखाली पास होते तेव्हा गाडी मालकास PUC प्रमाणपत्र दिले जाते.

यानुसार तुमच्या वाहनामुळे किती प्रदूषण होत आहे याची पडताळणी होते. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत नाही. सर्व वाहनांना PUC काढून घेणे बंधनकारक आहे. वाहन नोंदणीच्या एक वर्षांनंतर PUC काढणे बंधनकारक आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार कंपन्या जेव्हा गाडीची विमा पॉलिसी काढतात तेव्हा ते तुमच्या गाडीची वैध पियुसीची पडताळणी करतात. IRDA ने २० ऑगस्टला एक परिपत्रक जारी केले आहे त्या परिपत्रकात असे लिहिले आहे.

२०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने वाढते प्रदूषण पाहता विमा कंपन्यांना तसे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पियुसी प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय विमा मिळणार नाही. त्यामुळे कर तुम्ही तुमच्या गाडीचा PUC काढला नसेल तर आजच काढून घ्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.