रितेश आणि जेनेलियाचा नुकताच प्रदर्शित झालेला वेड हा मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी दाखवली आहे. महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना रितेश आणि जेनेलियाच्या वेड चित्रपटाने खऱ्या अर्थी वेड लावले आहे असे म्हणायला काही हरकत नाही.
३० डिसेंबर ला प्रदर्शित झालेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा कमाल केली आहे. रितेश आणि जेनेलिया यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच रितेशने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर जेनेलिया निर्माती आहे. याशिवाय जेनेलियाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
वेड चित्रपटाचे प्रदर्शित होण्याआधीच जोरदार प्रमोशन सुरू होते. रितेश आणि जेनेलिया दोघेही प्रमोशन दरम्यानच चर्चेचा विषय बनले होते. जोरदार केलेल्या प्रमोशनमुळे पहिल्याच दिवशी वेड चित्रपटाचा शो हाऊसफुल झाला होता.
या चित्रपटातील गाण्यांनीही लोकांची मनं आधीच जिंकली होती. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते. त्यामुळेच गेल्या तीन दिवसातच या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. कमाईचे आकडे बघता हा चित्रपट नवीन शिखर गाठेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.
तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे आकडे समोर केले आहेत. पहिल्याच दिवशी वेड चित्रपटाने २.२५ कोटींची कमाई केली होती. तसेच दुसऱ्या दिवशीही ३.२५ कोटी तर तिसऱ्या दिवशी ४.५० कोटींची कमाई केली. केवळ तीन दिवसातच या चित्रपटाने १० कोटींची कमाई केली आहे. तीन दिवसांची आकडेवारी बघता हा चित्रपट चांगलीच कमाई करणार असल्याचे दिसत आहे.
वेड या चित्रपटात सत्या (रितेश) हा क्रिकेट खेळण्यास माहीर असतो आणि त्याच्या प्रेमाची कथा या चित्रपटात बघायला मिळते. शेखरअण्णा नावाचा गुंड सत्याचा पक्का वैरी असतो. तो त्याचा वैरी का असतो हे चित्रपट बघितल्यावर कळेलच. सत्याचे श्रावणीसोबत लग्न झालेलं आहे. लग्नाला सात वर्षे होऊन दोघांमध्ये एक दरी आहे.
सत्या कायम दारू आणि सिगारेटच्या नशेत असतो. रेल्वेत काम करणारी श्रावणी त्याला दारूसाठी पैसे देते, सासरे काही बोलले तरी पतीच्या बाजूने बोलते, पतीसाठी वडीलांसोबतही भांडते. असं असूनही सत्या आणि श्रावणीमध्ये दुरावा का अशा सगळ्या प्रशांची उत्तरं १२ वर्षांपूर्वीच्या फ्लॅशबॅकमध्ये मिळतात, जी चित्रपटगृहात चित्रपट बघतांना आणखीनच मजा येईल.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा या जोडीचा मराठी चित्रपट वेड सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ते दोघेही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतांना दिसत आहेत. अशातच प्रमोशन दरम्यान त्यांनी काही कौंटुंबिक किस्सेही उलगडले आहेत. सणउत्सवाच्या निमित्ताने रितेश मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतोच.
अनेकदा त्यांची मुलं पापाराझी फोटोग्राफर्स समोर हात जोडून नमस्कार करतांना दिसतात. जेव्हाही त्यांचे फोटो काढले जातात तेव्हा ते हात जोडून नमस्कार करतात आणि फोटोग्राफर्सला थँक यू असे म्हणतात. यामागचे कारण विचारता, रितेश ने दिलेल्या उत्तरामुळे सगळ्यांची मने जिंकली आहेत.
महत्वाच्या बातम्या
आम्ही दोघंही सिगरेट आणि दारू…; रितेश जेनेलियाने केला मोठा खुलासा
कॅमेरा दिसताच तुझी मुले हात का जोडतात? रितेशच्या उत्तराने जिंकली सगळ्यांची मने
रितेश-जेनेलियाच्या वेड चित्रपटाला लोकांची तुफान गर्दी, पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई