पाकिस्तानपेक्षा जास्त सुरक्षित कोणतीच जागा नाही, म्हणणाऱ्या वसीम अक्रमच्या पत्नीला पाकिस्तानी लोकांनीच झोडले

अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांनी जबरदस्तीने सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे जगभरातून त्यांना विरोध केला जात आहे. असे असताना पाकिस्ताने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यूझीलंड क्रिकेट संघाने सामना सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण दौरा रद्द केला. त्यानंतर, पाकिस्तानी सोशल मीडियावर देशाचे सुरक्षित आहे असे दावे करणाऱ्यांची मालिकाच सुरू झाली. यामध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमची पत्नी शनायराने देखील ट्विट केले आहे. पण त्यानंतर तिथल्या लोकांनीच तिला ट्रोल केले आहे,

पाकिस्तानला असुरक्षित मानून न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने हा दौरा रद्द करणे हा खेळाडूंच्या हिताचा सर्वात जबाबदार निर्णय असल्याचे जाहीर केले. यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानचे ट्रोलही केले जात आहे.

आता वसीम अक्रमची पत्नी शनायरा हिने ट्विट केले की, जगात अशी कोणतीही जागा नाही जिथे मला पाकिस्तानपेक्षा जास्त सुरक्षित वाटते. ऑस्ट्रेलियन वंशाच्या असलेल्या शनायराने केलेले हे ट्विट लोकांना आवडले नाही, त्यामुळे पाकिस्तानी लोकांनीच तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

पाकिस्तानी वंशाचे पत्रकार आणि समीक्षक मोहम्मद तकी यांनी प्रत्युत्तर दिले, मी सुद्धा … जगातील कोणतीही जागा पाकिस्तानपेक्षा सुरक्षित वाटत नाही, विशेषत: जेव्हा मी फ्लोरिडामध्ये असतो.

काही लोकांनी शनायराच्या ट्विटवर प्रश्नही उपस्थित केला की, सर्व गुन्हे असूनही आणि दहशतवाद्यांना आश्रय देत असतानाही ती कोणत्या आधारावर पाकिस्तानची बाजू मांडत आहे?, त्यामुळे शनायराचे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

शनायरा बराच काळ मेलबर्नमध्ये राहत आहे. मात्र, पाकिस्तानात राहून तिने बरीच सामाजिक कामे केली आहेत. अक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून ती स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ता सुरक्षा, आरोग्य व्यवस्था यापासून पर्यावरणापर्यंत अनेक विषयांवर काम करत आहे. ती स्वत: ला पाकिस्तानी म्हणवते आणि सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

महत्वाच्या बातम्या-

बिग ब्रेकींग! पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह यांची निवड, राज्याला मिळणार पहिला दलित मुख्यमंत्री
“सोमय्यांना कोल्हापूरी हिसका दाखवणार, त्यांचा हा शेवटचा स्टंट असेल”
बाॅलीवूडची क्वीन कंगणा भिडली थेट हाॅलीवूड स्टार्सला; चोरीवरून थेट फटकारले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.