मनसेचे(MNS) नगरसेवक वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे(Pune) शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे वसंत मोरे(Vasant More) यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.(vasant more statment about mns expulsion)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेवर वसंत मोरे यांनी नाराजी दर्शवली होती. “मी माझ्या प्रभागामध्ये हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे मशीदींसमोर लावणार नाही”, असे वसंत मोरे म्हणाले होते. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील वसंत मोरे यांच्यावर नाराज झाले होते.
या नाराजीतूनच राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्यानंतर मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्यानंतरही मशिदींवरील भोंग्याबाबत माझी तीच भूमिका असणार आहे, असे मनसे नगरसेवक वसंत मोरे म्हणाले आहेत.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना वसंत मोरे यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चांवर देखील भाष्य केलं आहे. यावेळी मनसे नगरसेवक वसंत मोरे म्हणाले की, “मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका तीच राहील. माझी भूमिका ही सलोख्याचीच असणार आहे. माझ्या भागात शांतता राहावी, अशीच माझी भूमिका असणार आहे.”
“पक्षासाठी पद मोठं असेल, माझ्यासाठी पद मोठं नाही. माझं पद जरी गेल असेल तरी मी महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करत राहीन”, असे मनसे नगरसेवक वसंत मोरे सांगितले आहे. यावेळी वसंत मोरे नवीन शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच मी दुसऱ्या कोणताही पक्षात जाणार नाही, असे देखील वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे.
“साईनाथ बाबर माझाच कार्यकर्ता आहे. त्याच्या नियुक्तीचे मीच स्वागत करतो. मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही. माझं शहराध्यक्ष पद गेलं आहे. पण मनसे सैनिक पद गेलेलं नाही. मला सर्व मनसे नेत्यांचे फोन आले आहेत. पण मला अजुन राज साहेबांचा फोन आलेला नाही”, असे वसंत मोरे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘वसंत मोरेंची पक्षातील लोकांनीच राजकीय हत्या केली आहे’, रुपाली पाटलांचा मनसेवर गंभीर आरोप
..तर लोकं मला चपलीने मारतील; अभिनेता शरद केळकरने व्यक्त केली भिती
पाकिस्तानमध्ये पडलेल्या मिसाईलवर फिलीपींन्सने भारताला विचारला जाब, जाणून घ्या यामागचे कारण