मनसे नेते वसंत मोरे हे गेल्या काही महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आहे. त्यांच्यांत आणि पक्षातील काही पदाधिकाऱ्यांमध्ये वाद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तसेच प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. तेव्हापासून ते पक्षावर नाराज असल्याचे म्हटले जात होते.
वसंत मोरे हे त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि त्यांच्या फेसबूक पोस्टमुळेही चर्चेत येत असतात. आताही त्यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहे. त्यांनी मुस्लिम लोकांशी संबंधी एक पोस्ट लिहीली आहे. त्यांची पोस्ट खुप व्हायरल होत आहे.
वसंत मोरे यांची लोकांच्या मदतीला धावून जाणारे नेते म्हणून ओळखले जातात. ते नेहमीच लोकांची मदत करताना दिसतात. तसेच लोकांचे प्रश्न सोडवताना दिसतात. त्यामध्ये ते कधी जातपात पाहत नाही. जो त्यांच्याकडे समस्या घेऊन येईल त्यांच्या समस्या ते सोडवतात. आता त्याच संबंधी त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे.
फेसबूक पोस्ट-
कधी कधी मी निरपेक्ष पणे वर्णभेद , जात-पात , श्रीमंतगरीब हा कोणताही फरक न पाहता सर्वसामान्य जनतेची कामे करतो तेव्हा खुप समाधान वाटते, पुण्याच्या विविध भागातून लोक माझ्याकडे समस्या घेवून येतात मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो कधी कधी तर काही प्रभागात मुस्लिम नगरसेवक असतानाही तिकडचे मुस्लिम बंधू भगिनी माझ्याकडे येतात,
मी त्यांना सहजच विचारतो आरे भाभी तुम्हारे यहाँ भी नगरसेवक है वो काम नही करते क्या ?
तेव्हा आपसूक त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर येतात आप हमे बडे भाई के माफिक लगते हो आणि मग मनात एक विचार येतो जर यांना माझ्या कपाळावरील भगव्याची अडचण नाही तर मला बुरखा आणि टोपीची अडचण का असावी ???
महत्वाच्या बातम्या-
प्रवासी हेरतात अन् गुगल पे करायला सांगतात; एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांची लज्जास्पद लाचखोरी
पुण्यात मध्यरात्री १२ वाजता शरद पवार आंदोलनात रस्त्यावर, थेट शिंदेना..; जाणून घ्या नेमकं काय घडलं…
‘कसब्यातून निवडून आलो तर शनिवारवाडा पुन्हा ७ मजली करणार’; भाजपची मोठी घोषणा