Share

आधुनिक कृष्ण-सुदामा! वसंत मोरेंनी गरीब मित्रासाठी केली ‘ही’ खास गोष्ट; वाचून अभिमान वाटेल

गेल्या काही दिवसांपासून मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे चांगलेच चर्चेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्याबाबतच्या भूमिकेवर वसंत मोरे (Vasant More) यांनी नाराजी दर्शविली होती. त्यानंतर वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर वसंत मोरे पुण्यातील काही मनसे पदाधिकाऱ्यांवर नाव न घेता टीका केली होती. (vasant more friend facbook post viral )

आता पुन्हा एकदा मनसे नेते आणि नगरसेवक वसंत मोरे चर्चेत आले आहेत. सध्या मनसे नगरसेवक वसंत मोरे यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टच्या माध्यमातून नगरसेवक वसंत मोरे यांनी आपल्या मित्रांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. नगरसेवक वसंत मोरे यांनी मित्राच्या दुकानात जाऊन केस कापले आहेत.

मनसे नगरसेवक वसंत मोरे यांची ही पोस्ट सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी लिहिले आहे की, “एकमेका सहाय्य करू…हा आहे माझा लंगोटी यार हेमंत साबळे. आम्ही दोघे पहिली ते दहावी एकाच वर्गात शाळा शिकलो, हेमंत वर्गात खूपच हुशार होता.”

“त्याचे अक्षर तर मोत्यासारखे होते त्यामुळे त्याला शुद्धलेखनात सायकल बक्षिस मिळाली होती. त्याकाळी परिस्थिती नाजूक असल्याने त्याने पिढीजात चालून आलेला वडिलांचा व्यावसाय हाती घेतला. मागच्या महिन्यात जो एकत्र येण्याचा मित्रांचा कार्यक्रम झाला त्यात मला त्याच्या काही गोष्टी जाणवल्या त्याच्या परिस्थितीची जाण झाली आणि एक संकल्पना मनात आली”, असे मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

https://www.facebook.com/100044231363898/posts/pfbid0i5UzhLea8AKE6pNf5CapkPXW7Z2fAATycCWDYZNR5KNDMDh79kuLVnhYsUD7LUoTl/?d=n

मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “मी नेहमीच AC दुकानात दाढी करायला जातो पण आजपासून ठरवले आणि आमच्या ग्रुप समोर आयडिया ठेवली की सर्वांनीच मित्राला आर्थिक मदत करून त्याचा न्यूनगंड वाढवायचा नाही तर त्याच्याच दुकानात जायचे आणि त्याला स्वाभिमानी करायचे.”

“जर इतर समाजातील लोक हे करू शकतात तर मग आपण का असे करायचे नाही ?बघा जमले तर तुम्हीही तुमच्या मित्राना अशीच मदत करा हेमंतचे हे दुकान कात्रज संतोषनगर रोडवर भाजी मंडईच्या पुढे आहे”, असे मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
फिल्टरपाडाच्या झोपडपट्टीत राहणारा गौरव मोरे कसा झाला हास्यजत्रेचा स्टार, वाचा यशोगाथा
मामाची मेहनत ‘अशी’ आली फळाला, UPSC पास करत भाचा झाला मोठा अधिकारी, वाचा यशोगाथा
आपल्या पूर्वजांची माहिती, वंशावळ जपून ठेवणारा ‘भाट’ नेमका आहे तरी कोण? माहिती वाचून आश्चर्य वाटेल

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now