पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्यानंतर मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी नवनिर्वाचित शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची भेट घेतली आहे. वसंत मोरे यांच्या कात्रज(Katraj) परिसरातील कार्यालयाजवळ ही भेट झाली आहे. यावेळी मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी नवनिर्वाचित पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचे अभिनंदन केले आहे.(vasant more and sainath babar meeting)
यावेळी मनसे नगरसेवक वसंत मोरे आणि पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचे समर्थक देखील उपस्थित होते. या भेटीदरम्यान त्यांच्यात चाय पे चर्चा झाली आहे. वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमुळे त्यांच्यात सारं काही आलबेल असल्याचे सांगितले जात आहे.
या भेटीदरम्यान मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी पुष्पगुच्छ देत नवनिर्वाचित शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मनसे पक्षाकडून साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टच्या माध्यमातून वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
‘आरे मी तर कधी पासूनच तुझा मावळा आहे. कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड खुप खुप अभिनंदन साई”, अशा आशयाची पोस्ट वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या फेसबूक पोस्ट मधील फोटोमध्ये वसंत मोरे मावळ्याच्या वेशात आहेत. तर साईनाथ बाबर छत्रपतींच्या वेशात आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला बाबू वागस्कर, अनिल शिदोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर हजर होते. पण या बैठकीला वसंत मोरे यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वसंत मोरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा रंगू लागली होती.
या नाराजीतूनच राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्यानंतर मनसे नगरसेवक वसंत मोरे यांना वेगवेगळ्या पक्षातून ऑफर येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वसंत मोरेंना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘मुलगी झाली हो’ मालिका खरंच बंद होणार? स्टार प्रवाह वाहिनीने दिले स्पष्टीकरण
सुजात आंबेडकरांचे राज ठाकरेंना थेट आव्हान; म्हणाले, ‘मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही’
राज ठाकरेंच्या अजान संदर्भातील भूमिकेला मुस्लिम मनसैनिकांचा पाठींबा; वसंत मोरेंना लगावले टोले