वरुण धवनची बायको आहे यशस्वी बिजनेस वूमन; जाणून घ्या नताशा दलालबद्दल काही रोचक गोष्टी

फिल्म इंडस्ट्रीमध् सध्या लगीनसराई सुरु आहे. एकानंतर एक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले आहेत. त्यासोबतच आत्ता बॉलीवूडचा तरुण सुपरस्टार वरुण धवन देखील आज लग्न करणार आहे.

वरुण धवनने त्याची लॉंग टाईम गर्लफ्रेंड आणि लहानपणीची मैत्रीण नताशा दलालसोबत लग्न केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या नताशा आणि वरुणच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. आलिबागच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये दोघांचा लग्न सोहळा पार पडला आहे.

कोरोनामूळे नताशा आणि वरुणचे लग्न खुप कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. फिल्म इंडस्ट्रीतील काही मोजके लोकं या लग्नाला उपस्थित होते. कोरोना काळात सर्व गोष्टींची काळजी घेऊन हे लग्न पार पडले आहे.

वरुण धवन आजच्या घडीला इंडस्ट्रीतील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. २०१२ मध्ये त्याने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर मै तेरा हिरो, जुडवा, दिलवाले, ए बी सी डी, बद्री की दुल्हनिया यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केले. तो बॉलीवूडचा सर्वात मोठा स्टार झाला आहे.

वरुण नताशा दलालसोबत लग्न करणार आहे. शाळेपासून हे दोघे एकमेकांना ओळखतात. वरुणने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये नताशाबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला होता की, नताशा माझी लहानपणीची मैत्रीण आहे. ती सुरुवातीपासूनच खुप समजूतदार आहे. त्यामूळे आमचे नाते एवढे मजबूत आहे.

नताशाचा जन्म १६ मार्च १९८९ ला मुंबईमध्ये झाला होता. तिचे वडील राजेश दलाल मुंबईतील प्रसिद्ध व्यवसायिक आहेत. नताशा आणि वरुण एकाच शाळेत शिकत होते. पण त्यांचे अफेअर नव्हते. वरुणने एका मुलाखतीमधय सांगितले होते की, नताशाला त्याने तीन वेळा प्रपोज केले होते. अनेक वर्ष प्रयत्न केल्यानंतर नताशा त्याला हो बोलली आहे.

कॉलेज झाल्यानंतर वरुण अभिनेता बनण्यासाठी बॉलीवूडमध्ये आला. तर नताशाने फॅशन डिझायनिंगमध्ये डिग्री पुर्ण केली आहे. ती मुंबईतील प्रसिद्ध डिझायनर आहे. मुंबईमध्ये नताशाचा स्वत चा व्यवसाय आहे. ती डिझायनर म्हणून खुप प्रसिद्ध आहे.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्या अगोदरपासूनच वरुण नताशाला डेट करत आहे. बॉलीवूडमध्ये आल्यानंतर अनेक अभिनेत्रींसोबत वरुणने नाव जोडले गेले. पण तरीही त्याचा परिणाम या दोघांच्या नात्यावर झाला नाही. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघे लग्न करत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

दिग्दर्शकाच्या ‘त्या’ घाणेरड्या मागणीला कंटाळून मल्लिका शेरावतने सोडली होती फिल्म इंडस्ट्री

पुण्यामध्ये पारंपारिक पद्धतीने सिध्दार्थ आणि मितालीचा विवाहसोहळा पडला पार; बघा लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ

करिना कपूरने सांगितले बेडरुममधले ‘हे’ रहस्य; म्हणाली रोज सकाळी सैफ…

आरारारा! जेनियलियाने रितेशसोबतचा बेडवरचा व्हिडीओ केला शेअर; उघडाबंब रितेश जेनेलियाला..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.