‘आयुष्यभराच्या प्रेमावर शिक्कामोर्तब’; पहा वरुण धवनच्या लग्नाचे सुंदर फोटो…

मुंबई | फिल्म इंडस्ट्रीमध् सध्या लगीनसराई सुरु आहे. एकानंतर एक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले आहेत. त्यासोबतच आत्ता बॉलीवूडचा तरुण सुपरस्टार वरुण धवन देखील लग्नाच्या बेडीत अडकला आहे.

वरुण धवनने त्याची लॉंग टाईम गर्लफ्रेंड आणि लहानपणीची मैत्रीण नताशा दलालसोबत लग्न केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या नताशा आणि वरुणच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर रविवारी आलिबागच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये दोघांचा लग्न सोहळा पार पडला आहे.

या दोघांचा विवाहसोहळा अत्यंत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडला. उपस्थित सर्वांना कोव्हिड-19 चाचणी करणे सक्तीचे होते, अशी माहिती मिळते आहे.  यावेळी वरुणने डिझाईनर कुणाल रावलच्या कलेक्शनमधली शेरवानी घातली होती तर नताशासुद्धा मनीष मल्होत्राने खास तयार केलेल्या लहंगामध्ये दिसली.

दरम्यान, वरुणने त्यांच्या लग्नाचे फोटो ‘Life long love just became official ❤️’ अर्थात ‘आयुष्यभराच्या प्रेमावर शिक्कामोर्तब’ अशा कॅप्शनसह हे फोटो शेअर केले आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्या अगोदरपासूनच वरुण नताशाला डेट करत आहे.

बॉलीवूडमध्ये आल्यानंतर अनेक अभिनेत्रींसोबत वरुणने नाव जोडले गेले. पण तरीही त्याचा परिणाम या दोघांच्या नात्यावर झाला नाही. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आता हे दोघे लग्न बंधनात अडकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
ठाकरे सरकारला केंद्राचा ठेंगा; शिफारस केलेल्या ९८ पैकी ‘या’ एकमेव व्यक्तीला पद्म पुरस्कार
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना ‘पद्मश्री’ घोषित; भावना व्यक्त करताना अश्रू अनावर, म्हणाल्या…
रोहित पवारांच्या ‘त्या’ फोटोंनी सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ; भाजपनेही केली जहरी टीका..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.