वरुण धवनच्या बायकोने त्याला तीन वेळा केले होते रिजेक्ट; वाचा लव्ह स्टोरी

वरुण धवनने त्याची लॉंग टाईम गर्लफ्रेंड आणि लहानपणीची मैत्रीण नताशा दलालसोबत लग्न केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या नताशा आणि वरुणच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. नवीन वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी लग्न केले. दोघांच्या जोडीला चाहते खुप पसंत करतात.

वरुण धवन आजच्या घडीला इंडस्ट्रीतील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. २०१२ मध्ये त्याने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर मै तेरा हिरो, जुडवा, दिलवाले, ए बी सी डी, बद्री की दुल्हनिया यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केले. तो बॉलीवूडचा सर्वात मोठा स्टार झाला आहे.

वरुण नताशा दलालसोबत लग्न करणार आहे. शाळेपासून हे दोघे एकमेकांना ओळखतात. वरुणने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये नताशाबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला होता की, नताशा माझी लहानपणीची मैत्रीण आहे. ती सुरुवातीपासूनच खुप समजूतदार आहे. त्यामूळे आमचे नाते एवढे मजबूत आहे.

नताशाचा जन्म १६ मार्च १९८९ ला मुंबईमध्ये झाला होता. तिचे वडील राजेश दलाल मुंबईतील प्रसिद्ध व्यवसायिक आहेत. नताशा आणि वरुण एकाच शाळेत शिकत होते. पण त्यांचे अफेअर नव्हते. वरुणने एका मुलाखतीमधय सांगितले होते की, नताशाला त्याने तीन वेळा प्रपोज केले होते. अनेक वर्ष प्रयत्न केल्यानंतर नताशा त्याला हो बोलली आहे.

कॉलेज झाल्यानंतर वरुण अभिनेता बनण्यासाठी बॉलीवूडमध्ये आला. तर नताशाने फॅशन डिझायनिंगमध्ये डिग्री पुर्ण केली आहे. ती मुंबईतील प्रसिद्ध डिझायनर आहे. मुंबईमध्ये नताशाचा स्वत चा व्यवसाय आहे. ती डिझायनर म्हणून खुप प्रसिद्ध आहे.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्या अगोदरपासूनच वरुण नताशाला डेट करत आहे. बॉलीवूडमध्ये आल्यानंतर अनेक अभिनेत्रींसोबत वरुणने नाव जोडले गेले. पण तरीही त्याचा परिणाम या दोघांच्या नात्यावर झाला नाही. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघे लग्न करत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

लग्नासाठी विवेक ऑबेरॉयने त्याच्या पत्नीसमोर ठेवली होती ‘ही’ अट; अट ऐकूण बायको झाली होती आश्चर्यचकीत

व्हॅलेंटाईन डे स्पेशल: फक्त ७५० रुपयांमध्ये केले होते लग्न नाना पाटेकरने लग्न; वाचा त्यांची लव्ह स्टोरी

जाणून घ्या मिलिंद गवळी यांची खरी लव्ह स्टोरी; लग्नासाठी ठेवली होती ‘ही’ अट

व्हॅलेंटाईन डे स्पेशल: वाचा धकधक गर्ल माधूरी दीक्षित आणि श्रीराम नेनेची लग्नानंतरची हटके लव्ह स्टोरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.