खास कॅप्शनसह वरुणने शेअर केले लग्नाचे फोटो; ‘या’ शब्दात केलेय बायकोचे कौतूक..

मुंबई | सध्या फिल्म इंडस्ट्रीमध् लगीनसराई सुरु आहे. एकानंतर एक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले आहेत. त्यासोबतच आत्ता बॉलीवूडचा तरुण सुपरस्टार वरुण धवन देखील लग्नाच्या बेडीत अडकला आहे.

वरुण धवनने त्याची लॉंग टाईम गर्लफ्रेंड आणि लहानपणीची मैत्रीण नताशा दलालसोबत लग्न केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या नताशा आणि वरुणच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर रविवारी आलिबागच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये दोघांचा लग्न सोहळा पार पडला आहे.

यावेळी वरुणने डिझाईनर कुणाल रावलच्या कलेक्शनमधली शेरवानी घातली होती तर नताशासुद्धा मनीष मल्होत्राने खास तयार केलेल्या लहंगामध्ये दिसली. या दोघांचा विवाहसोहळा अत्यंत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडला. उपस्थित सर्वांना कोव्हिड-19 चाचणी करणे सक्तीचे होते, अशी माहिती मिळते आहे.

दरम्यान, वरुणने त्यांच्या लग्नाचे फोटो ‘Life long love just became official ❤️’ अर्थात ‘आयुष्यभराच्या प्रेमावर शिक्कामोर्तब’ अशा कॅप्शनसह हे फोटो शेअर केले आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्या अगोदरपासूनच वरुण नताशाला डेट करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा! ‘बर्ड फ्लू’साठी मिळणार मदत, वाचा काय म्हणाले मंत्री…
शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावर शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…
बलात्का.राची तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे भावूक, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.