Share

वाराणसीमध्ये ईव्हीएम कुठे नेले जात होते? निवडणूक आयोगाने केला खुलासा

EVM

उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh) वाराणसीमध्ये निवडणुकांच्या निकालापूर्वी ट्रकमधून ईव्हीएम(EVM) घेऊन जाण्यात येत होते. यावरून समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारवर गंभीर आरोप केले होते. योगी सरकारकडून ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यात येत आहे, असा आरोप सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला होता.(varansi-evm-conterversy-election-revealedcommision-reveled)

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनीही यासंदर्भातील व्हिडिओ ट्विट करत निवडणूक आयोगावर आरोप केले होते. आता या प्रकरणावर सरकारची बाजू समोर आली आहे. अखिलेश यादव यांनी केलेल्या आरोपांवर वाराणसीचे जिल्हा दंडाधिकारी कौशल राज शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

जिल्हा दंडाधिकारी कौशल राज शर्मा म्हणाले की, ” हे ईव्हीएम मशीन प्रशिक्षणाच्या उद्देशाने मंडी येथील गोदामातून युपीमधील एका कॉलेजमध्ये नेले जात होते. त्यावेळी काही राजकीय लोकांनी हे वाहन थांबवले आणि त्यात ठेवण्यात आलेल्या ईव्हीएमचा निवडणुकीत वापर झाल्याची अफवा पसरवली”, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

ईव्हीएम मशीन प्रकरणावरून समाजवादी पक्षाने मंगळवारी ८ मार्च रोजी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत समाजवादी पक्षातील नेत्यांनी योगी सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. मतमोजणीपूर्वीच निवडणुकीशी संबंधित ईव्हीएम स्टोर रूममधून बाहेर काढून इतरत्र नेले जात असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला होता.

https://twitter.com/srinivasiyc/status/1501200024981495808?s=20&t=Br0CXGcoq88aHZH44ncEKQ

मतदान यंत्रांमध्ये छेडछाड करण्याच्या उद्देशाने हे करण्यात आले आहे, असा दावा अखिलेश यांनी पत्रकार परिषदेत केला होता. मतदान यंत्रांमध्ये छेडछाड करण्यात येत आहे ही माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचा दावाही त्यांनी केला होता. यावेळी त्यांनी अधिकाऱ्याचे नाव सांगण्यास नकार दिला होता.

याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देताना सांगितले की, वाराणसीमधील वाहनातून जप्त करण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन अधिकाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यासाठी आणण्यात आल्या होत्या, त्यांचा मतदानात वापर करण्यात आला नाही. सोमवारी सर्व वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल समोर आले होते. या एक्झिट पोलनुसर यूपीमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या :-
४०० करोडचे मालक असलेल्या अनुपम खेर यांनी एकदा मंदिरातून चोरले होते ११८ रुपये, आईने दिली होती कानाखाली
महिलेला मधलं बोट दाखवणाऱ्या इंजिनिअरला बेदम मारहाण, वाचा संपूर्ण प्रकरण
मुख्यमंत्री साहेब..! शेती परवडत नाही, वाईन विकण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now