Vantara Wildlife : वन्यजीव संरक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अनंत अंबानी (Anant Ambani wildlife work) यांना अमेरिकेत झालेल्या एका प्रतिष्ठित सोहळ्यात ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. वनतारा (Vantara animal rescue project) या मोठ्या संवर्धन उपक्रमाचं नेतृत्व करत त्यांनी जखमी, आजारी आणि संकटात सापडलेल्या शेकडो प्राण्यांना पुनर्जीवन दिलं आहे. याच कार्यामुळे ते हा मान मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती ठरले आहेत. याआधी हा पुरस्कार अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी आणि बिल क्लिंटन यांच्यासारख्या जागतिक नेत्यांनी स्वीकारला होता.
हा सन्मान मिळाल्यानंतर वनताराची ओळख पुन्हा एकदा जागतिक स्तरावर ठसली आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वसमावेशक वन्यजीव संरक्षण प्रकल्पांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमात प्राण्यांच्या बचावापासून त्यांच्या उपचारांपर्यंत आणि सुरक्षित पुनर्वसनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर सातत्याने काम केले जाते. दुर्लक्षित, अत्याचार झालेल्या आणि नामशेष होण्याच्या धोक्यात असलेल्या अनेक प्रजातींना येथे नवं आयुष्य मिळतं.
पुरस्कार स्वीकारताना अनंत अंबानींनी सांगितलं की, “हा सन्मान सर्व सजीवांच्या कल्याणाच्या मार्गावर अधिक निश्चयाने चालण्याची प्रेरणा देतो. प्राणी आपल्याला सहजीवन, संवेदनशीलता आणि संतुलन शिकवतात. वनताराच्या माध्यमातून प्रत्येक जीवाचा सन्मान आणि काळजी हा आमचा मूलभूत उद्देश आहे.” त्यांनी स्पष्ट केलं की संवर्धन हे उद्याचं काम नसून आजपासून प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे आणि मानवजातीने पर्यावरणाबाबत संवेदनशील पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम ग्लोबल ह्यूमन सोसायटीने आयोजित केला होता. संस्थेने अनंत अंबानींच्या उपक्रमाचं कौतुक करताना म्हटलं की, वनतारा हे फक्त उपचार केंद्र नसून बचाव, उपचार, काळजी आणि पुनर्वसन या चारही घटकांचा एकत्रीत, अभिनव आणि प्रभावी नमुना आहे. या प्रकल्पाने संकटातील प्राण्यांना मोठ्या प्रमाणात कशी मदत करता येते याचा जागतिक आदर्श निर्माण केला आहे, असं आयोजकांनी नमूद केलं.
या समारंभाला जगभरातील संवर्धन क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. भारतातून डॉ. नीलम खैरे, डॉ. व्ही.बी. प्रकाश आणि डॉ. के.के. शर्मा यांनी प्रतिनिधित्व केलं. जागतिक स्तरावरील संशोधक आणि तज्ज्ञांच्या उपस्थितीत वंताराच्या कार्याचं सर्वांनी कौतुक केलं.