Accident : वंदे भारत एक्सप्रेसबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आज (गुरुवार) मुंबई ते गांधीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात झाल्याची ही बातमी आहे. सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
वंदे भारत एक्सप्रेस गांधीनगरवरून मुंबईला येत असताना हा अपघात घडला आहे. वटवा स्टेशनवरून मणिनगरला येत असताना रेल्वे मार्गावर म्हशींचा कळप आडवा आला. त्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात रेल्वेच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे.
मुख्य म्हणजे ३० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर या रेल्वेने प्रवाशांना सेवा देण्यास सुरुवात केली होती. मात्र, आज अचानक या रेल्वेचा अपघात झाला आहे. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ पीआरओ जेके जयंत यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, सकाळी ११ वाजताच्या सुमारास वंदे भारत ट्रेन वटवावरून मणिनगरला येत होती. त्यावेळी अचानक मध्येच एक म्हशींचा कळप आला आणि अपघात घडला.
या अपघातात ट्रेनच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले असून यातील सर्व प्रवाशी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आला नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
वंदे भारत या ट्रेनचा वेग ताशी १८० किलोमीटर एवढा आहे. गांधीनगरपासून अहमदाबाद आणि मुंबईपर्यंत धावणारी ही देशातील तिसरी वंदे भारत ट्रेन आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या राजधान्यांना जोडणारी ही ट्रेन प्रवाशांसाठी अतिशय सोयीची मानण्यात येते.
महत्वाच्या बातम्या
Udit Narayan : गायक उदित नारायण यांना आला हृदयविकाराचा झटका? मॅनेजरने सांगीतले व्हायरल पोस्टमागील सत्य
politics : शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई विद्यापीठात घाणीचे साम्राज्य; सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा ढिग
Poniyin Selvan: विक्रम वेदाच नाही तर रजनीकांतच्या चित्रपटांनाही PS-1 ने टाकले मागे, कमावले तब्बल ‘एवढे’ कोटी
Ekanth Shinde : ‘मुख्यमंत्री शिंदेंचे भाषण फारच सुमार, वत्कृत्व आणि लोकांचे प्रेम विकत आणता येत नाही’