‘व्हॅलंटाईन डे’ ला पती पत्नीसाठी गिफ्ट घेऊन आला, पत्नीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

नवी दिल्ली| ‘व्हॅलंटाईन डे’ दिवशी अनेकजण आपल्या आवडत्या व्यक्तिला गिफ्ट देऊन खुश करत असतात. प्रेमाचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. हरियाणा राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.

व्हॅलंटाईन डे च्या दिवशी पतीने आपल्या पत्नीची निर्घूणपणे हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गूरूग्राम येथे व्हॅलंटाईन डे च्या दिवशी पती पत्नीला गिफ्ट घेऊन घरी आला मात्र पत्नी घरी  नव्हती. पत्नीचे बाहेर प्रेमप्रकरण सूरू असल्याचा संशय अनेक दिवसांपासून पतीला होता. पत्नी घरी आल्यावर  पतीने रागाच्या भरात पत्नीला मारहाण केली आणि त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती सतीश कुमार आणि त्याची पत्नी रूबी दोघांमध्ये नेहमी भांडण होत होती. सतीशला रूबीचं बाहेर प्रेमप्रकरण सूरू असल्याचा संशय येत होता. १४ फेब्रूवारी या दिवशी सतीश रूबीसाठी गिफ्ट आणायला गेला होता. गिफ्ट घेऊन घरी आल्यानंतर रूबी घरात दिसली नाही. ती घरी आल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात त्याने रूबीची हत्या केली .

सतीश हा कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्याचे आठ वर्षापुर्वी  रूबीसोबत लग्न झाले होते. त्यांना दोन मुलंही आहेत. लग्न झाल्यानंतर काहि दिवस संसार सूरळीत चालल्यानंतर सतीश कुमार हा रूबीला अनैतिक संबंधाच्या संशयावरून मारहाण करत होता.

घटनेनंतर सतीश कुमार त्याच्या मुळगावी उत्तर प्रदेश राज्यात पळून गेला होता. पोलिसांनी सतीश कुमारला उत्तर प्रदेशमध्ये जाऊन अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गूरूग्राम पोलिस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
अरेरे! ही तर वारं आल्यावर उडून जाईल; टेलिव्हिजनवरील नागिन झिरो फिगरमूळे झाली ट्रोल
व्हिडीओ: भयाण आग लागलेल्या इमारतीतून आईने मुलांना ‘असं’ वाचवलं, पहा श्वास रोखणारा थरार
हौसेला मोल नाय! पुण्यात छापली चक्क सोन्याची लग्नपत्रिका, पत्रिकेची किंमत आहे तब्बल…
‘कारभारी लयभारी’ या मराठी मालिकेतील प्रसिध्द अभिनेत्रीला भररस्त्यात मारहाण, पाहा व्हिडिओ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.