व्हॅलेंटाईन डे दिवशी जुळल्या रेशीमगाठी; बिग बॉसच्या घरात आणखी एक जोडी जुळली

मुबंई: टेलिव्हिजवरील सर्वात चर्चित कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. आत्तापर्यंत बिग बॉसच्या घरात अनेक वाद झाले आहेत. त्यासोबतच अनेक जोड्या देखील बनल्या आहेत. अशीच अजून एक प्रेम कहाणी बिग बॉसच्या घरातून पुढे जात आहे.

बिग बॉसच्या कालच्या भागात व्हॅलेंटाईन डेचे सेलिब्रेशन करण्यात आले. हे सेलिब्रेशन बिग बॉसच्या घरातील प्रत्येक व्यक्तिसाठी खुप खास होते. प्रत्येक स्पर्धकाने हा प्रेमाचा दिवस साजरा केला. पण हा भाग गायक राहूल वैद्यसाठी खुप खास होता. आयूष्यभर त्याच्या लक्षात राहिल असाच हा भाग होता.

कारण कालच्या व्हॅलेंटाईन डे विशेष भागात राहूलने परत एकदा त्याच्या प्रेमाची कबूली दिली आहे. प्रेमाच्या या खास भागासाठी राहूलची गर्लफ्रेंड दिशा परमार बिग बॉसच्या घरात आली होती. दिशा टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

लाल रंगाच्या साडीत दिशा खुपच सुंदर दिसत होती. दिशाला घरात पाहून राहूलला सुरुवातीला धक्का बसला होता. पण त्याने या संधीचा फायदा घेत. दिशाला परत एकदा प्रपोज केले. या अगोदर राहूलने नोव्हेंबर महिन्यात दिशाला प्रपोज केले होते.

कालच्या भागात राहूलने नॅशनल टेलिव्हिजनवर दिशाला लग्नासाठी प्रपोज केले. तु माझ्याशी लग्न करशील का या प्रश्नाचे उत्तर देत दिशा म्हणाली की, हा मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. राहूलच्या आईने देखील त्यांच्या लग्नाला होकार दिला आहे. जुनमध्ये दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

स्वप्नाली पाटीलने आस्तादसाठी घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

मेकअप न करता ‘अशा’ दिसतात बॉलीवूडच्या अभिनेत्री; फोटो बघून शॉक व्हाल

महाराष्ट्राच्या इतिहासातील रणरागिणी ‘छत्रपती ताराराणी’ साकारणार सोनाली कुलकर्णी; पहा फस्ट लुक

सोशल मिडियावर शिल्पा शेट्टीने पहिल्यांदाच शेअर केला मुलीचा व्हिडिओ; पाहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.