Vaishnavi Hagavane : वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणात आता राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वैष्णवी हगवणे यांच्या आई-वडिलांची भेट घेतली आणि त्यांच्या दुःखात सहभागी होत भावनिक आधार दिला.
या भेटीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांचा व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला. सुळे यांनी वैष्णवीच्या वडिलांशी संवाद साधताना, “ही लढाई तुमची एकटीची नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत. घाबरू नका,” असे आश्वस्त केले.
व्हीआयपी ट्रीटमेंटचा आरोप
यावेळी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, अटकेत असलेल्या वैष्णवीच्या सासरच्या व्यक्तींना पोलीस कोठडीत व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. “रंगीला पंजाब हॉटेलमधून त्यांना जेवण पुरवले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. प्रशांत जगताप यांनीही या मुद्द्यावर चिंता व्यक्त करत, “या बाबतीत उद्या पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार करणार आहे,” असे सांगितले.
सुप्रिया सुळे यांचा भावनिक प्रतिसाद
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला ऑपरेशन सिंदूरसाठी बाहेरगावी जावं लागतंय. नाहीतर मी स्वतः तुमच्याकडे आले असते. यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. मात्र परत आल्यानंतर तुमची प्रत्यक्ष भेट घेईन,” असे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी सुळे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना उद्याच आंदोलन करण्याचे निर्देश देत, “आंदोलनात हे सर्व मुद्दे समोर आणा,” असे आवाहन केले.
vaishnavis-father-complained-crying-profusely