Share

Vaishnavi Hagwane : ‘तू कसली घाणेरडी, पतीसोबत कधी लॉयल नव्हतीस’, वैष्णवीने मैत्रिणीला सांगीतलं होतं गाऱ्हाणं, ऑडिओ क्लिप व्हायरल

Vaishnavi Hagwane : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूप्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. सुरुवातीला आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले असले तरी, शवविच्छेदन अहवालात गंभीर मारहाणीचे पुरावे आढळून आल्याने तिची हत्या झाल्याचा संशय बळावला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू आणि नणंदेला अटक केली असून, सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा सध्या फरार आहेत. पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे.

दरम्यान, वैष्णवी आणि तिच्या मैत्रिणीमधील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, तिच्यात तिने सासरच्या लोकांकडून सुरू असलेल्या छळाची माहिती दिली आहे. या क्लिपमध्ये वैष्णवीने म्हटलंय की, “माझा नवरा माझ्या बाजूने नाही, मी मोठी चूक केली. आता डिवोर्सच घेतला पाहिजे.”

तिने हेही सांगितले की, “सासरच्या लोकांकडून माझी बदनामी केली जाते, पतीनेही मारहाण केली. माझ्यावर घाणेरड्या शिव्या दिल्या जातात, आईवडिलांवर अपशब्द बोलले जातात.”

या व्हॉईस मेसेजमध्ये वैष्णवीने मानसिक आणि शारीरिक छळ किती टोकाला पोहोचला होता, हे स्पष्ट होतं. या संवादातून वैष्णवीचा हतबलपणा आणि आतल्या घुसमटीची झलक समोर येते.

सध्या ही क्लिप व्हायरल होत असून, ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ने याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. मात्र वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणात या क्लिपमुळे चौकशीला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

वैष्णवीच्या कुटुंबियांनी सासरच्या लोकांवर हत्या आणि छळाचे आरोप करत, मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे यांच्यावर लवकरात लवकर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणावर अजूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now