Share

Vaishnavi Hagavane : ‘कामवालीचं मॅटर, तिची लफडी बाहेर आली अन्…’, वैष्णवी हगवनेचे मैत्रिणीसोबतचे ‘ते’ चॅट आले समोर

Vaishnavi Hagavane : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पुण्यातील नेते राजेंद्र हगवणे यांच्या सून वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणात नवे वळण आले आहे. सुरुवातीला आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले असले तरी, शवविच्छेदन अहवालात संशयास्पद बाबी आढळल्याने तिचा खून झाल्याचा आरोप आता पुढे येत आहे.

या प्रकरणी वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली असून, सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा अद्याप फरार आहेत. दरम्यान, वैष्णवी हगवणे आणि तिच्या मैत्रिणीमधील चॅट आणि व्हॉईस मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या संभाषणातून सासरच्या मंडळींकडून वैष्णवीवर झालेल्या छळाचे गंभीर संकेत मिळत आहेत.

व्हायरल चॅटमधील मुख्य मुद्दे:

व्हायरल चॅटमध्ये वैष्णवीने स्पष्टपणे सांगितले आहे की, ती सासरच्या वागणुकीमुळे मानसिकदृष्ट्या खचली होती आणि घटस्फोट घेण्याचा विचार करत होती.

“मला त्या माणसासोबत खूप त्रास झालाय. या वेळेस तर त्यांनी हद्दच केली. त्यांच्या घरच्यांनी मला मारहाण केली. मी आता राहू शकत नाही,” असा संदेश वैष्णवीने मैत्रिणीला पाठवला होता. चॅटमध्ये कामवालीशी संबंधित एका वादातून घरात तिला जबाबदार धरल्याचा उल्लेखही आहे. तिच्यावर विनाकारण आरोप झाले आणि त्यातून मोठा वाद निर्माण झाला, असे ती सांगते.

व्हॉईस मेसेजमध्ये वैष्णवी म्हणाली:
“मला मारताना तुझे दाजी बघत होते. नंतर त्यांनीही माझ्यावर हात उचलला. त्यामुळे मी ठरवलं आहे की, मी डिवोर्स घेणार,” असा ठाम निर्णय वैष्णवीने आपल्या पित्याला कळवल्याचे ती मेसेजमध्ये सांगते.  पुढे ती म्हणते, “माझा नवरा माझ्याबाजूने नाही याचं खूप दुःख होतं. मी सगळ्यांचा विरोध करून त्या घरात गेले, ती माझी चूक होती.”

या व्हायरल झालेल्या संवादांमधून वैष्णवीच्या वैवाहिक जीवनातील तणाव, मारहाण आणि मानसिक त्रास याचे स्पष्ट संकेत मिळतात. मात्र, ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ने या ऑडिओ क्लिप आणि चॅटच्या सत्यतेची अधिकृत पुष्टी केलेली नाही.

पोलिस तपास सुरूच

या प्रकरणात अजूनही मुख्य आरोपी फरार असून, पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, हगवणे कुटुंबावर राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचे आरोपही नातेवाइकांनी केले आहेत. वैष्णवीच्या कुटुंबियांनी तिच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
vaishnavi-hagavanes-that-chat-with-her-friend-comes-to-light

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now