‘मनसेकडून आमदारकी लढवलेल्या ‘या’ प्रसिद्ध गायिकेने केला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश’

मुंबई : गायिका वैशाली माडे आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मराठी बिग बॉसमुळे वैशाली माडे चर्चेत आल्या होत्या. त्यात त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

वैशाली माडे या ३१ मार्चला मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश करणार आहेत. दुपारी १२ वाजता हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

वैशाली यांच्या पक्ष प्रवेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, कला, साहित्य आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला ही माहिती दिली आहे. आणि खुद्द वैशाली माडे यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांत दिग्गज मराठी कलाकारांनी राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीत प्रवेश केला आहे. माडे यांनी प्रवेश करावा यासाठी दोन ते तीन महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर माडे यांच्या होकारानं आता त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, वैशाली माडे या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत गायिका म्हणून सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी २००८ मध्ये ‘झी मराठी’च्या ‘सा रे ग म प’च्या पर्वाच्या विजेत्या ठरल्या आहेत आणि हाच त्यांच्या आयुष्याचा ‘टर्निंग पाँईंट’ ठरला. त्यानंतर ‘झी’च्या हिंदी ‘सा रे ग म प’मध्ये ही त्यांनी आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर बाजी मारली.

महत्त्वाच्या बातम्या 

..त्यावेळी माधवनच्या मागे मुलींचा ग्रुप असायचा, विश्वास नांगरे पाटलांनी सांगितले मैत्रीचे भन्नाट किस्से

धक्कादायक! वडिलांच्या पिस्तुलाने गोळी झाडून भाजपच्या नगरसेविकेच्या मुलाची आत्महत्या

मोठी बातमी! शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; आॅपरेशन व एन्डोस्कूपी करणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.