शिवसेनेच्या वर्धापनदिनी भन्नाट ऑफर; भाजपचे ओळखपत्र दाखवा अन् पेट्रोल मोफत मिळवा

जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे, तेव्हा पासून शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक वाद आरोप-प्रत्यारोपणाचा खेळ सुरु आहे. अशात शिवसेनेच्या वर्धापनदिनी पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. तसेच या उपक्रातून त्यांनी भाजपला टोलाही लगावला आहे.

आमदार वैभव नाईक यांनी वर्धापनदिनानिमित्त स्वस्तदरात पेट्रोलची विक्री करण्याचा एक उपक्रम हाती घेतला आहे. सामान्य स्वस्त दरात तर भाजपचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना फुकटात पेट्रोल देण्यात येईल, अशी घोषणा वैभव नाईक यांनी केली आहे.

सर्व सामान्य नागरीकांना १०० रुपयांमध्ये दोन लीटर पेट्रोल देण्यात येणार आहे. तर भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी १ लीटर पेट्रोल मोफत वाटप करण्यात येणार आहे.

वैभन नाईक यांच्या या उपक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळाला असून सोशल मीडियावरही या उपक्रमाची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र या उक्रमाच्या माध्यमातून वैभव नाईकांनी भाजपला टोला लगावल्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्व शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांची वाढदिवस होता. त्यावेळी शिवसेनेकडून डोंबिवलीमध्ये अशाच प्रकारचा एक उपक्रम राबविण्यात आला होता. एक रुपयाला एक लीटर पेट्रोल अशा दराने सर्व सामान्यांना पेट्रोल वाटप करण्यात आले होते. हे पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर रांगाच्या रांगा लागल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

औरंगाबादमध्ये डिझेलचा टँकर पलटी; डिझेलसाठी शेकडो लोकांची धावपळ, तर एका पठ्ठ्याने आणला २०० लीटरचा ड्रम
मानलं बुवा! लाॅकडाऊनचा सदूपयोग करत जोडप्याने स्वत:च खोदली विहीर; २५ दिवसांत पाणीच पाणी
सुरैयाच्या घरच्यांनी दिली होती देवानंदला जीवे मारण्याची धमकी; घाबरलेल्या सुरैयानी केले ब्रेकअप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.