“नितेश राणे यांचा पराभव करून शिवसेना काय चीज आहे, ते दाखवून देऊ”

मुंबई : अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपच्या संजना सांवत यांची अध्यक्षपदावर निवड झाली आहे. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा राणे साहेबांच्या पाठीमागे खंबीर उभा असून आम्हाला आव्हान देणारा धक्का देणा-याला दहा जन्म घ्यावे लागतील, असा थेट इशारा नितेश राणे यांनी शिवसेनेला दिला होता.

तसेच जिल्ह्यामधे वैभव नाईक हे आम्हाला आयुष्यात कधीच स्पर्धा करू शकत नाहीत आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झाल आहे, अशी टीका करत नितेश राणे यांनी वैभव नाईक यांना आव्हान दिले होते. नितेश राणे यांनी दिलेल्या या इशाऱ्याला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आव्हान दिले आहे.

‘नितेश राणे यांचा कणकवलीत पराभव करून शिवसेना काय चीज आहे, हे दाखवून देऊ. नारायण राणे यांचे आव्हान आम्ही कधीच संपवले. २०१४ च्या निवडणुकीत राणेंसारख्या माजी मुख्यमंत्र्याचा पराभव केला, तर गेल्या निवडणुकीत माझ्यामुळेच नारायण राणे यांनी पळ काढला,’ अशी टीका नाईक यांनी केली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यानंतर नितेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर टीका केली होती. सिंधुदुर्गात राणेंना आव्हान देणारा किंवा धक्का देणाऱ्याला दहा जन्म घ्यावे लागतील, असे नितेश राणे म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या 

संजय राऊत तुम्ही काय शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? नाना पटोलेंनी राऊतांना झापले

पतीच पत्नीला दीर आणि सासऱ्यांसोबत संबंध ठेवायला भाग पाडत होता; म्हणाला द्रोपदी बनून राहावं लागेल

धक्कादायक! ‘इथं राहायचं असेल तर द्रोपदी होऊन राहावं लागेल’, पतीची पत्नीला धमकी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.