बापरे! अवघ्या ७ रुपयाला मिळणाऱ्या शेअरची किंमत झाली ७१८ रुपये, लाख रुपये गुंतवणारे झाले करोडपती

आज आम्ही तुम्हाला अशा आश्चर्यकारक स्टॉकबद्दल सांगत आहोत ज्याने १ लाख रुपये गुंतवणाऱ्याचे १ कोटी रुपये केले आहे. वैभव ग्लोबल या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 10 वर्षांत मालामाल करुन टाकले आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये संयम ठेवला त्यांना बंपर परतावा मिळाला आहे. ही एक रत्ने आणि दागिन्यांची कंपनी आहे.

१० वर्षांपूर्वी म्हणजेच १६ सप्टेंबर २०११ रोजी, NSE वर वैभव ग्लोबलच्या शेअर्सची किंमत ७.१३ रुपये होती, जी १७ सप्टेंबर २०२१ रोजी ७१८ रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच वैभव ग्लोबल या कंपनीत गुंतवणाऱ्या लोकांना शेअर्सचा परतावा या 10 वर्षात १०० टक्के दिला आहे.

गेल्या ६ महिन्यांत वैभव ग्लोबलच्या शेअर्सवर खूपची किंमत वाढत चालली आहे. मार्च २०२१ पासून मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वैभव ग्लोबलचे शेअर्स वाढत राहिले. या दरम्यान, कंपनीचे शेअर्स ९९६.७० रुपयांवर पोहोचले होते. मात्र, यानंतर भरपूर प्रॉफिट बुकिंग झाले आणि ते खाली आले.

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विक्री बंद असूनही, वैभव ग्लोबलचे शेअर्स यावर्षी आतापर्यंत ५१०.४२ रुपयांवरून ७१८ रुपयांवर गेले आहेत. त्यानुसार, कंपनीच्या शेअर्सने ४० टक्के परतावा दिला आहे. गेल्या एक वर्षाचा कालावधी पाहिला तर वैभव ग्लोबलचे शेअर्स ३७५ रुपयांवरून ७१८ रुपयांवर गेले आहेत. त्यानुसार या शेअर्सने ९१ टक्के परतावा दिला आहे.

त्याचप्रमाणे, गेल्या ५ वर्षांत, वैभव ग्लोबलचे शेअर्स ६२ रुपयांवरून ७१८ रुपये झाले. जर एखाद्या गुंतवणूकदाराने ५ वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये १ लाख गुंतवले असते तर आज त्याचे १ लाख रुपये ११ लाख ५० हजार रुपये झाले असते.

जर आपण गेल्या १० वर्षांचा रेकॉर्ड बघितला तर १७ सप्टेंबर २०२१ रोजी वैभव ग्लोबलचे शेअर्स ७.१३ रुपयांवरून ७१८ रुपये झाले. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने १० वर्षांपूर्वी वैभव ग्लोबल शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे १ लाख आज 1 कोटी झाले असते. कारण या काळात स्टॉक १०० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त वाढला होता.

महत्वाच्या बातम्या-

अरे वाह! आता घराच्या छतावर बसवा सौरउर्जा पॅनेल; केंद्राकडून मिळणार ४० टक्के अनुदान, असा करा अर्ज
पाठकबाईंची नऊवारीवरची आगळीच अदा,फोटो पाहून नेटकरी म्हणतात आम्ही होतो ‘राणा’दा…
माणूस समोर गेला की मनोहरमामा त्याची संपूर्ण माहिती कसं काय सांगायचा? बिंग फुटले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.